Join us

‘साता जल्माच्या गाठी’मध्ये पाहायला मिळणार नवा संघर्ष,मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 06:30 IST

Saataa Jalmaachyaa Gaathi Serial : लग्नानंतर श्रुती कशी वागेल? तिला कसं मुठीत ठेवता येईल? हे त्यांनी आखलेले मनसुबे मात्र फोल ठरत आहेत.

छोट्या पडद्यावरील ‘साता जल्माच्या गाठी’ ही मालिका सध्या गाजते आहे. दिवसेंदिवस मालिकेतील ट्विस्ट आणि रंजक गोष्टी रसिकांना भावतायत. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा खास आहेत. सगळ्याच कलाकारांच्या भूमिकांना रसिकांची पसंती मिळाली आहे. ही मालिका रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. नंदा देवींनी रघु आणि श्रुतीच्या लग्नाचा आखलेला प्लॅन यशस्वी तर झाला. पण लग्नानंतर श्रुती कशी वागेल? तिला कसं मुठीत ठेवता येईल? हे त्यांनी आखलेले मनसुबे मात्र फोल ठरत आहेत. 

रघुसोबत लग्न लावून देण्यात नंदादेवींचं कारस्थान होतं हे सत्य श्रुतीसमोर उघड झालंय. श्रुतीच्या प्रेमासाठी कायपण करण्यासाठी तयार असणारा युवराज तिचं लग्न रघुशी लावून देईल असं श्रुतीला स्वप्नातही वाटलं नव्हतं. म्हणूनच श्रुतीच्या मनात आता युवराज विषयी प्रचंड तिरस्काराची भावना आहे. नंदादेवींना जाब विचारण्याचं धैर्य आजवर कुणीच दाखवलं नाहीय मात्र श्रुती नंदादेवींना आपली फसवणुक का केली याचा जाब विचारणार आहे. इतकंच नाही तर नंदादेवींच्या वर्चस्वालाही आव्हान देणार आहे.

त्यामुळे ‘साता जल्माच्या गाठी’ मालिकेच्या यापुढील एपिसोड्समध्ये नंदादेवी विरुद्ध श्रुती असा संघर्ष पाहायला मिळेल. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या श्रुतीला रघु साथ देणार का? युवराज कोणाच्या पाठीशी ठामपणे उभा रहाणार? हे पहाणं औत्सुक्याचं असेल.

टॅग्स :साता जल्माच्या गाठी