Join us

"साधी भोळी माझी आई...", रुपाली भोसलेची खास पोस्ट, मायलेकीच्या जोडीचा फोटो बघितला का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 11:50 IST

अभिनेत्री रुपाली भोसलेनं आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

Actress Rupali:  अभिनेत्री रुपाली भोसले ही तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. अगदी सामान्य कुटुंबातून येत स्वत:ची तिनं ओळख निर्माण केली. सिनेसृष्टीची घरात कोणतीही पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रात एन्ट्री केली. गेली अनेक वर्षे ती या क्षेत्रात यशस्वी अभिनेत्री म्हणून काम करतेय.  तिचा हा प्रवास काही सोपा नव्हता. पण, या प्रवासात तिला कायम तिच्या आईची साथ लाभली. आज अभिनेत्रीच्या आईचा वाढदिवस आहे. यानिमित्तानं तिनं आईला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

रुपाली भोसलेचा सोशल मीडियातील वावरही मोठा आहे. फेसबुक, इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना कायम ती आयुष्यातील अपडेट देत असते. आताही तिच्या एका पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. रुपालीनं इन्स्टाग्रामवर आईचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहली आहे. 

रुपालीने पोस्टमध्ये लिहलं, "साधी भोळी माझी आई... सुखाची ग तु साऊली... जीव ओवाळून लावी.. माझी ग तु लाडू बाई. स्वत:ला विसरुन इतरांसाठी सर्व काही करणारी. तू प्रेम दिलेस, सगळ्यांना तू नेहमीच जपलेस, खूप कष्ट सोसले पण आता येणारा प्रत्येक क्षण. तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा, यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल, तुझ्या चेहऱ्यावरचे हे गोड हसू, असेच काय असू दे, माझ्या आयुष्यातील यशाच्या शिड्या जिच्या जिववार मी चढल्याअशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मातोश्री", या शब्दात तिनं आईवरील प्रेम व्यक्त केलं आहे. 

रुपालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती गेली अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत काम करतेय. मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिनं काम केलंय. सुमित राघवन यांच्यासोबत 'बडी दूर से आये है' ही तिची मालिका प्रचंड गाजली होती. रुपाली 'एका पेक्षा एक' या रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती. 'मन उधाण वाऱ्याचे', 'कन्यादान' अशा अनेक मालिकांमध्ये तिनं काम केलंय. तर 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजनाची भूमिका साकारली होती. या मालिकेनं नुकताच निरोप घेतलाय. आता चाहते तिच्या नव्या प्रोजेक्टची वाट पाहत आहेत.  

टॅग्स :रुपाली भोसलेसेलिब्रिटीमराठी अभिनेता