Join us

बॉयफ्रेन्डसोबत लग्नबंधनात अडकली अभिनेत्री रुबीना दिलेक, बघा फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 12:19 IST

अनेक वर्षांच्या रिलेशनशिनंतर दोघांनी शिमलामध्ये मोठ्या धडाक्यात लग्न केले.

मुंबई : हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलेक हिने बॉयफ्रेन्ड अभिनव शुक्लासोबत गुरुवारी लग्न केले. दोघांच्याही लग्नाचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. अनेक वर्षांच्या रिलेशनशिनंतर दोघांनी शिमलामध्ये मोठ्या धडाक्यात लग्न केले.

रुबीना 'शक्ती - अस्तित्व के एहसास की' या मालिकेत ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. तर अभिनव हा 'सिलसिला बदलते रिश्तों का' या मालिकेच व्हिलनची भूमिका करत आहे. 

रुबीनाच्या मेहंदीचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यात ती तिच्या आईसोबत दिसत आहे. या दोघांचं लग्न शिमलामध्ये झालं असलं तरी रुबीना ही हिमाचलची आहे तर अभिनव हा पंजाबचा आहे. आता या दोघांच्या लग्नाचं रिसेप्शन लुधियाना आणि मुंबईमध्ये होणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी