Join us

मिस्टर बजाज-प्रेरणाचा रोमान्स! 22 वर्षांनंतर रोनित रॉय-श्वेता तिवारी एकत्र; Photos व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 16:04 IST

२२ वर्षांनंतर या जोडीला एकत्र पाहून चाहते आनंदात आहेत.

एकता कपूरची लोकप्रिय मालिका 'कसौटी जिंदगी की'ची आजही चर्चा होते. मालिकेतील रोनित रॉय (Ronit Roy) आणि श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) जोडी भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात हिट जोडी समजली जाते. त्यांची जबरदस्त केमिस्ट्री सर्वांनाच आवडली. रोनित रॉयने मिस्टर बजाज आणि श्वेता तिवारीने 'प्रेरणा' ही भूमिका साकारली. रोनितने नुकतेच श्वेता तिवारीसोबत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. तब्बल २२ वर्षांनंतर हे दोघंही पुन्हा एकत्र आले आहेत.

२२ वर्षांनंतर या जोडीला एकत्र पाहून चाहते आनंदात आहेत. मात्र दोघं नक्की कोणत्या प्रोजेक्टसाठी एकत्र आलेत असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. 'कसोटी जिंदगी की' पार्ट 2 तर येणार नाही ना असा अंदाजही चाहत्यांनी बांधायला सुरुवात केली आहे. तर यांचे हे रोमँटिक फोटो पाहून चाहत्यांची नजरच हटत नाहीए. 'आमच्या उत्कटतेचा दरवळ आमच्या हृदयांची कहाणी सांगतं. रोमान्सच्या या क्षणांमध्ये आमच्यासोबत गुंतून राहा.' असं रोमँटिक कॅप्शन या फोटोंना दिलं आहे.

श्वेता आणि रोनित दोघंही एकमेकांमध्ये हरवलेले दिसत आहेत. या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. त्यांची ही पोस्ट एका नवीन प्रोजेक्टची हिंट देत आहे. या फोटोंमध्ये श्वेता प्रचंड सुंदर दिसत आहे. चमकदार साडी आणि आकर्षक हेअरस्टाईलने लक्ष वेधून घेतलंय. तर रोनित टॅन सूट आणि ब्लॅक टीशर्टमध्ये दिसतोय. 'सुंदर जोडी','मिस्टर बजाज और प्रेरणा' असं म्हणत चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ही जोडी नक्की काय नवीन घेऊन येतीये हे लवकरच कळेल.

टॅग्स :रोनित रॉयश्वेता तिवारीव्हायरल फोटोज्