Join us

कर्णच्या भूमिकेसाठी अशीम गुलाटी घेतोय मेहनत, मेकअपला लागतो 'इतका' वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 06:00 IST

‘कर्णसंगिनी’च्या रूपात ‘स्टार प्लस’ वाहिनी पौराणिक प्रेमकथेसारख्या वेगळ्या विषयावरील मालिका प्रेक्षकांपुढे सादर करीत आहे. महाभारताच्या पार्श्वभूमीवरील ही एक आगळी प्रेमकथा आहे

ठळक मुद्देअशीम गुलाटी या मालिकेत सूर्यपुत्र कर्णाची भूमिका साकारणार आहेमला कर्णाच्या भूमिकेसाठी तयार होण्यास तब्बल दीड तास लागतो

कर्णसंगिनी’च्या रूपात ‘स्टार प्लस’ वाहिनी पौराणिक प्रेमकथेसारख्या वेगळ्या विषयावरील मालिका प्रेक्षकांपुढे सादर करीत आहे. महाभारताच्या पार्श्वभूमीवरील ही एक आगळी प्रेमकथा आहे. या मालिकेत आजवर अज्ञात असलेल्या सूर्यपुत्र कर्ण आणि त्याची संगिनी (प्रेयसी) राजकन्या उरुवी यांच्यातील प्रेमकथेचे चित्रण करण्यात आले आहे. अभिनेता अशीम गुलाटी या मालिकेद्वारे प्रथमच पौराणिक मलिकेच्या क्षेत्रात भूमिका रंगविणार आहे. या मालिकेत तो सूर्यपुत्र कर्णची भूमिका साकारणार आहे. तो सांगतो, “मला कर्णाच्या भूमिकेसाठी तयार होण्यास तब्बल दीड तास लागतो. त्याचं रूप इतरांपेक्षा अगदी वेगळं आहे. त्याचे केस असोत, त्याचा पेहराव असो की त्याची रंगभूषा- तो इतरांपेक्षा वेगळाच दिसतो. मला ही भूमिका जास्तीत जास्त वास्तववादी आणि नैसर्गिक पध्दतीने उभी करायची होती. त्यामुळे केवळ स्पेशल इफेक्टवर अवलंबून न राहता मी माझ्या अंगावर सूर्यकवच चढवितो. हे सूर्यकवच सिलिकॉनपासून बनविलं जातं आणि ते दररोज नव्याने बनवावं लागतं. ते तयार करण्यासाठी निदान 45 मिनिटे लागतात. ते झाल्यावर मगच मला वेशभूषा आणि रंगभूषा करता येते. माझे कपडे आणि दागिने बरेच अवजड आहेत. पण शेवटी या सर्वाचा परिणाम मात्र उत्कृष्ट दिसतो.” अशीम हसून म्हणाला, “या मालिकेत प्रथमच मी तयार होण्यासाठी अभिनेत्रीपेक्षा (उरुवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशपेक्षा) अधिक वेळ घेतो.”

टॅग्स :कर्णसंगिनी