बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्यामुंबईतील जुहू येथील घराबाहेर काल मध्यरात्री गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. सध्या त्याच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून चाहतेही रोहित शेट्टीच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत. आता या प्रकरणाच्या तपासात एक मोठी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री ज्या वेळी रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार झाला, त्या वेळी तो घरामध्येच उपस्थित होता. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, गोळीबार करणारा आरोपी एकटाच होता. घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहेत. सीसीटीव्हीमध्ये आरोपी चालत येताना आणि गोळीबार करताना स्पष्ट दिसत आहे.
क्राइम ब्रांचच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात गँगस्टर लिंक असण्याची शक्यता लक्षात घेऊन तपास केला जात आहे. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. रोहित शेट्टींच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराला दुजोरा देताना मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, "इमारतीवर गोळीबार झाला आहे आणि आम्ही सर्व अँगलने याचा तपास करत आहोत."
या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. परिसरातील पोलीस फौजफाटा आणि तपासाचे दृश्य यात दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे या गोळीबारात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. रोहित शेट्टीने अद्याप या घटनेवर कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. मात्र या हल्ल्याने सेलिब्रिटींच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
Web Summary : Gunshots were fired outside Rohit Shetty's Mumbai home. Shetty was inside during the incident. Police are investigating, focusing on a possible lone shooter and potential gang connections. No injuries were reported. The incident raises concerns about celebrity security.
Web Summary : रोहित शेट्टी के मुंबई स्थित घर के बाहर गोलीबारी हुई। शेट्टी घटना के समय अंदर ही थे। पुलिस जांच कर रही है, एक अकेले शूटर और संभावित गिरोह कनेक्शन पर ध्यान केंद्रित कर रही है। कोई घायल नहीं हुआ। घटना ने सेलिब्रिटी सुरक्षा को लेकर चिंता जताई।