Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Shetty House Firing: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील शुभम लोणकरच्या सांगण्यावरूनच गोळीबार; मुले कशी शोधली, किती पैसे दिले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:00 IST

बॉलिवूड चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून, यात बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी शुभम लोणकरचे कनेक्शन समोर आले आहे. 

Rohit Shetty House Firing Shubham Lonkar: रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ११ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. या प्रकरणात आता बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील शुभम लोणकरचे नावही समोर आले आहे. शुभम लोणकरच्या सांगण्यावरूनच दुसऱ्या आरोपीने मुले शोधली. त्यांना पैसे दिले गेले होते, असेही सूत्रांनी सांगितले आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात हरयाणा आणि उत्तर प्रदेशातून आरोपींना अटक केली. या सगळ्या कटामागे शुभम लोणकर असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

गोळीबार करण्यासाठी मुले कशी शोधली?

पोलिसांनी केलेल्य तपासातून अशी माहिती समोर आली की, शुभम लोणकरच्या सांगण्यावरूनच विष्णू कुशवाह याने शूटर दीपक शर्मा, सनी कुमार, सोनू कुमार आणि इतर मुलांना या कामासाठी तयार केले. बेरोजगार असलेले आणि रील बनवणाऱ्या तरुणांना यासाठी शोधण्यात आले. 

मोठा माणूस बनवणार, भरपूर पैसे देणार

जे तरुण गोळीबार करण्याच्या कटात सामील झाले. त्यांना मोठमोठी आश्वासने दिली गेली. पैसे मिळवून देण्याचे लालच दिली गेली आणि गँगशी जोडले गेले तर मोठे माणूस व्हाल, असे सांगितले गेले. 

जे तरुण सोशल मीडियावर शस्त्र दाखवत रील बनवतात, पण ते बेरोजगार आहेत, अशा मुलांचा शोध घेतला. त्यांना या जाळ्यात ओढण्यात आले. 

सूत्रांनी सांगितले की, पोलिसांना असा संशय आहे की, मुख्य शूटर दीपक शर्मा याला पिस्तुल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. हे प्रशिक्षण कुठे आणि किती दिवस दिले गेले, कुणी दिले याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. 

५० हजार दिले आणि पैसे देणार होते

गोळीबार करण्यापूर्वी आरोपींना ५० हजार रुपये आगावू दिले गेले होते. हे पैसे शुभम लोणकरने विष्णू कुशवाह याला पाठवले होते. कुशवाहने हे पैसे शूटर दीपकला दिले होते. आरोपींना असेही सांगण्यात आले होते की, घटनेनंतर त्यांना मोठी रक्कम दिली जाईल. 

आरोपी सिग्नल अॅपववरून एकमेकांशी बोलत होते आणि तिथेच त्यांना टार्गेट सांगण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी ७ जणांना कुठे गोळीबार करायचा याबद्दल माहिती होती. गोळीबार केल्यानंतर काही आरोपी आग्रा आणि काही नोएडाला गेले होते. त्यांना तिथे ज्यांनी लपण्यासाठी मदत केली, त्या जतिन आणि विशाल यालाही याबद्दल माहिती होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Shetty House Firing: Shubham Lonkar's orders led to shooting.

Web Summary : Rohit Shetty's house firing linked to Shubham Lonkar of Baba Siddiqui case. Lonkar ordered the shooters, recruited unemployed youth promising money and a 'big' future. They received ₹50,000 in advance, communicated via Signal, and fled to Agra and Noida after the shooting.
टॅग्स :रोहित शेट्टीगुन्हेगारीमुंबई पोलीसगोळीबार