Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Shetty: चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर बिश्नोई गँगचा गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 06:57 IST

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील 'शेट्टी टॉवर' या निवास्थानाबाहेर शनिवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील 'शेट्टी टॉवर' या निवास्थानाबाहेर शनिवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने पुण्यातून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर काही तासांतच, गैंगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार शुभम लोणकर, आरा बिश्नोई यांच्या नावाच्या समाज माध्यम खात्यावरून गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली. त्यानंतर शेट्टी यांच्या बंगल्याबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

प्राथमिक तपासानुसार, शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी बंगल्याच्या गॅलरीच्या काचेतून आत शिरल्याचे समजते. १२ पोलिस पथकांद्वारे तपास सुरूआहे. आरोपी पुण्याला पळाल्याचे स्पष्ट होताच सीसीटीव्ही फुटेजद्वारे माग काढत त्यांना ताब्यात घेण्यात आले.

संशयित आरोपी सिद्धार्थ दीपक येणपुरे (२०), समर्थ शिवशंकर पोमाजी (१८), स्वप्नील बंडू सकट (२३), अमन आनंद मरोठे (२७), आदित्य ज्ञानेश्वर गायकी (१९) या संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आहे. यापैकी दोघे पुण्याच्या कर्वेनगर, तर तिघे धायरीचे राहणारे आहेत. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Firing at Rohit Shetty's house; Bishnoi gang claims responsibility.

Web Summary : Shots were fired at director Rohit Shetty's residence in Juhu, Mumbai. The Bishnoi gang claimed responsibility. Police arrested five suspects from Pune. An investigation is underway, and security has been heightened around Shetty's property.
टॅग्स :रोहित शेट्टीबॉलिवूडगोळीबार