Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिया चक्रवर्तीने शेअर केला खास फोटो; म्हणाली, प्रेम हीच ताकद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 12:21 IST

रिया सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झालेली पाहून तिच्या चाहत्यांना आनंद झाला होता. आता रियाने पुन्हा एक फोटो शेअर केला आहे.

ठळक मुद्देरियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास रियाचा आगामी सिनेमा ‘चेहेरे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती कधी नव्हे इतकी चर्चेत आली होती. त्याच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी तिला  तुरूंगाची हवा खावी लागली होती. एक महिन्यानंतर रिया जामिनावर तुरुंगातून बाहेर आली आणि त्यानंतर आता तिचे आयुष्य पूर्ववत होताना दिसत आहे. सुशांत प्रकरणानंतर   रिया चक्रवर्ती सोशल मीडियापासून दुरावली होती. मात्र 8 मार्चला महिला दिनानिमित्ताने रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. तब्बल सहा महिन्यानंतर रिया सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झालेली पाहून तिच्या चाहत्यांना आनंद झाला होता. आता रियाने पुन्हा एक फोटो शेअर केला आहे. प्रेम हे एक फॅब्रिक आहे. त्याचा रंग कधीही फिका पडत नाही, असे हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.

रियाने  मैत्रीण आणि निर्माती निधी परमारसोबत फोटो शेअर केला आहे. ‘प्रेम हे एक फॅब्रिक आहे. त्याचा रंग कधीही फिका पडत नाही. ते फॅब्रिक किती वेळा पाण्यात धुतलं तरी काही फरक पडत नाही...’, अशा कॅप्शनसह तिने हा फोटो शेअर केला आहे. शिवाय रियाने या फोटोला #LOVEISPOWER असा हॅशटॅगही दिला आहे.  सध्या तिची ही  पोस्ट  तुफान व्हायरल होत आहे.  

सुशांत प्रकरणानंतर रियाने सोशल मीडियाकडे पाठ वळवली होती. आॅगस्ट 2020 मध्ये रियाने शेवटची सोशल मीडिया पोस्ट केली होती. त्यानंतर जवळपास 6 महिन्यांनी तिने  जागतिक महिला दिनाचे निमित्त साधत इन्स्टाग्राम पोस्ट केली होती.

सॉरी, लोकांनी तुला खूप त्रास दिला...; सोशल मीडिया युजर्स का मागत आहेत रिया चक्रवर्तीची माफी?

रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर होता. या फोटोत तिने एक हात तिच्या हातात घट्ट पकडला आहे. ‘आम्हाला महिला दिनाच्या शभेच्छा.. आई आणि मी.. कायम एकत्र..माझी ताकद, माझा विश्वास, माझं मनोबल, माझी आई,’असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते.रियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास रियाचा आगामी सिनेमा ‘चेहेरे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  

टॅग्स :रिया चक्रवर्ती