Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण आला रे कोण आला...! रितेशभाऊचा नादच खुळा; अनोख्या जॅकेटची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 14:19 IST

रितेश त्याच्या फॅशन स्टाइलने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. आता त्याच्या डेनिम जॅकेटची चर्चा सर्वत्र रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 

रितेश देशमुख आणि जिनिलीया हे कलाविश्वातील लोकप्रिय कपल आहेत. महाराष्ट्राच्या या दादा-वहिनीकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. अनेकदा रितेश आणि जिनिलीयाचे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. रितेश त्याच्या फॅशन स्टाइलने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. आता त्याच्या डेनिम जॅकेटची चर्चा सर्वत्र रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 

नुकतंच जिनिलीया आणि रितेशला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी ते दोघेही डेनिम लूकमध्ये दिसून आले. जिनिलीयाने जीन्स पँट आणि डेनिम जॅकेट घातलं होतं. तर रितेशनेही तिला ट्विनिंग करत डेनिम लूक केला होता. पण, या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते रितेशच्या जॅकेटने. रितेशच्या जॅकेटवर मागच्या बाजूला वाघाचा चेहरा प्रिंट केला होता. तर त्याच्या जॅकेटवर "आला आला भाऊ" असंही लिहिलं असल्याचं दिसत आहे. 'इन्स्टंट बॉलिवूड' या पापाराझी पेजवरुन रितेशचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.  या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

रितेश आणि जिनिलीया अलिकडेच जामनगरमध्ये झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्यात दिसले होते. २०१२ साली रितेश आणि जिनिलीयाने विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांना दोन मुलं आहेत. रितेश आणि जिनिलीया अनेकदा त्यांचे मजेशीर व्हिडिओ शेअर करताना दिसतात. 

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजामराठी अभिनेता