Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील 'या' ठिकाणी व्हॅकेशन एन्जॉय करतेय ऋता दूर्गुळे, शेअर केला क्युट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 17:01 IST

छोट्या पडद्यावरील ऋता दूर्गुळे हे प्रसिद्ध नाव आहे.

सोशल मीडियावर ऋता दूर्गुळे नेहमीच सक्रीय असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. चाहत्यांकडून वाहवा मिळवताना दिसते. सई  इन्स्टाग्रामवर आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती आणि व्हॅकेशनचे फोटो ही ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. ऋता सध्या हिमाचलमधील मनालीमध्ये व्हॅकेशम एन्जॉय करते आहे. इन्स्टाग्रामवर तिने मनालीमधील स्वेटशेट घातलेला फोटो शेअर केला आहे. या फोटो ऋता खूपट क्युट दिसतेय. तिच्या चाहत्यांनी ही तिचा हा अंदाज आवडला आहे लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस तिच्यावर या फोटोवर पडला आहे. 

छोट्या पडद्यावरील ऋता दूर्गुळे हे प्रसिद्ध नाव आहे. आपल्या विविध भूमिकेंच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.  वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री ऋता दुर्गुळे आता टाईमपास ३ या चित्रपटात झळकणार आहे.

ऋताने दुर्वा , फुलपाखरू यांसारख्या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच सिंगिग स्टार या रिॲलिटी शो मध्ये देखील ती झळकली होती. स्ट्रॉबेरी शेक सारखी एक वेगळी शॉर्ट फिल्म आणि दादा एक गुड न्यूज आहे या नाटकात देखील तिने काम केले आहे.काही दिवसांपूर्वीच ऋता सिंगिग स्टार या रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसली होती. 

टॅग्स :ऋता दूर्गुळे