Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऋषी कपूर आणि मुलगा रणबीरचा फोटो शेअर करून नीतू कपूरने लिहिली ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 14:48 IST

नीतू कपूरने ऋषी कपूरचा नवा फोटो शेअर केला आहे. ज्यात नीतू ऋषी कपूर व मुलगा रणबीरसोबत सेल्फी काढताना दिसते आहे.

नीतू कपूरने ऋषी कपूरचा नवा फोटो शेअर केला आहे. ज्यात नीतू ऋषी कपूर व मुलगा रणबीरसोबत सेल्फी काढताना दिसते आहे. कपूर कुटुंबाच्या या फोटोवर आलिया भट व तिची आई सोनी राजदाननेदेखील कमेंट केली आहे.

अभिनेते ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. गेल्या वर्षीपासून त्यांची पत्नी नीतूदेखील त्यांच्यासोबत तिथेच राहत आहे. नीतू त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंच्या माध्यमातून त्यांच्या तब्येतीबद्दल अपडेट मिळत राहतात. तसेच रणबीर देखील त्यांना भेटण्यासाठी जात असतो. मात्र त्यांचे चाहते ते पूर्ण बरे होऊन भारतात कधी परतणार, याची वाट पाहत आहेत. नीतू कपूरने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात ऋषी कपूर, नीतू रणबीरसोबत सेल्फी काढताना दिसत आहेत.  

नीतू कपूरने हा सेल्फी सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, 'ही खूप छान फिलिंग आहे जिथे पॉझिटिव्हिटी, आनंद आणि प्रेम एकत्र तुमच्यासोबत आहे.' या फोटोंवर आलिया भट आणि तिची आई सोनी राजदाननेदेखील कमेंट केली आहे. दोघांनी हार्ट इमोजी पोस्ट करून आपला आनंद व्यक्त केला.

रणबीर कपूरने नुकतेच एका पुरस्कार सोहळ्यात ऋषी कपूर यांच्याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, 'आता त्यांची तब्येत आधीपेक्षा बरी आहे आणि लवकरच ते भारतात येणार आहेत. पप्पा चित्रपटांना व त्यांच्या शूटिंगला खूप मिस करत आहेत. सर्वांनी केलेल्या प्रार्थनेमुळे ते लवकरच बरे होऊन भारतात परतणार आहे.'रणबीर लवकरच आलिया भटसोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे.

टॅग्स :रणबीर कपूरऋषी कपूरनितू सिंग