Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बॉबी' सिनेमाच्या शूटिंगवेळी डिंपल कपाडियावर भाळले होते ऋषी कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 10:43 IST

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते व तुमचा आमचा ‘चिंटू’ अर्थात ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला.

काल बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान चाहत्यांना सोडून गेला आणि आज बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते व तुमचा आमचा ‘चिंटू’ अर्थात ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेत सगळ्यांना मोठा धक्का दिला. रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. ऋषी कपूर त्यांच्या कामापेक्षा वादांमुळे अधिक चर्चेत राहिले होते. तसेच वैयक्तिक आयुष्यातही ऋषी कपूर यांचे आयुष्य एकार्थाने वादळीच म्हणायला हवे. लीड हिरो म्हणून ‘बॉबी’ हा ऋषी कपूर यांना पहिला डेब्यू सिनेमा होता.

यात त्यांच्यासोबत डिम्पल कपाडिया दिसली होती. डिम्पलचाही हा पहिला सिनेमा होता. हा सिनेमा करता करता ऋषी कपूर डिम्पलवर भाळले होते. डिम्पलला प्रपोज करण्याची त्यांची इच्छा होती. पण वडील राज कपूर यांच्या नकाराने त्यांनी त्यांच्या भावना कधीच व्यक्त केल्या नाहीत. त्यानंतर त्यांच्या जीवनात नीतू कपूर आल्या आणि डिम्पलला विसरत ऋषी कपूर यांचे अफेअर सुरु झाले. पण नीतू यांच्यासोबत लग्नानंतरही ऋषी कपूर अभिनेत्रींशी फ्लर्ट करण्याचा चान्स सोडत नव्हते.

ऋषी यांच्या जीवनात जेव्हा नीतू सिंग आल्या त्याच्यानंतरही ऋषी कपूर इतर अभिनेत्रींसोबत फ्लर्ट करत असत. पण नीतूअगोदरही अभिनेत्री यास्मिनसोबत त्यांचे 5 वर्ष अफेअर होते. नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. यानंतर ऋषी यांना डिम्पल आवडू लागली.नीतू सिंग यांनी एका मुलाखतीत ऋषी कपूरबदद्ल सांगितले होते. ते म्हणजे, ऋषी कपूर फार कडक बॉयफ्रेन्ड होते. ते नीतू सिंगला रात्री ८.३० नंतर शूटिंग करण्याची परवानगी देत नसत. नीतू यांना ऋषी कपूर यांच्या अफेअरबाबत माहिती होते. ते जेव्हाही पकडले जात तेव्हा साफ नकार देत असत आणि नीतू त्यांच्या प्रत्येक शब्दाला भूलतं. कदाचित त्याचमुळे ऋषी कपूर यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धोका दिल्यानंतरही ते कायम त्यांच्यासोबत राहिल्या.

नीतू यांनी सांगितले की ते एकमेकांना डेट करत होते तेव्हाही ऋषी कपूर इतर अभिनेत्रींसोबत फ्लर्ट करत होता.

९० च्या दशकात दोघांमध्ये फार कडाक्याचे भांडण झाल्याची चर्चा होती. ऋषी यांचे दारूचे व्यसन प्रचंड वाढले होते.त्यातच त्यांचा चिडका स्वभाव. या भांडणानंतर नीतू यांनी त्यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराची केसही दाखल केल्याचे कळते. नीतू याबद्दलही बोलल्या होत्या. प्रत्येक विवाहीत जोडप्याच्या जीवनात अशी वेळ येते जेव्हा दोघे एकमेकांच्या विचारांशी सहमत नसतात. पण आम्ही दोघांनी मिळून ती परिस्थिती सांभाळली, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

टॅग्स :ऋषी कपूरडिम्पल कपाडिया