Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली रणबीर कपूरची भाची समायरा, पण रिद्धिमाच्या लेकीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 08:56 IST

रिद्धिमा कपूर तिची लेक समायरासोबत या लग्नाला हजर होती. यावेळी समायराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

कपूर घराण्यात सध्या सनईचौघडे वाजत आहे. रणबीर कपूरचा चुलत भाऊ आदर जैन नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला. १२ जानेवारीला आदर जैनने त्याची बालपणीची मैत्रीण अलेखा अडवाणीसोबत ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. तर आता त्यांनी हिंदू पद्धतीने लग्न केलं आहे. त्यांच्या वेडिंग सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. आदर जैन आणि अलेखाच्या लग्नाला कपूर कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. 

रिद्धिमा कपूर तिची लेक समायरासोबत या लग्नाला हजर होती. रणबीर कपूर, आलिया भट आणि नीतू कपूरही या आदर आणि अलेखाच्या लग्नाला आल्या होत्या. यावेळी समायराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पारंपरिक लूकमध्ये समायरा दिसून आली. तिने साडी नेसून मामाच्या लग्नाला हजेरी लावली होती. यानिमित्ताने पहिल्यांदाच समायरा कॅमेरासमोर दिसली. पण, नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल केलं आहे. 

समायराने रिद्धिमा आणि नीतू कपूर यांच्यासोबत फोटोसाठी पापाराझींना पोझ दिल्या. वुम्पला या पापाराझी अकाऊंटवरुन याचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. पण, समारायला पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. पापाराझींना फोटो साठी पोझ देताना तिच्या चेहऱ्यावर जराही हास्य दिसत नाही. "त्यांनी तिला जबरदस्तीने आणलंय का", "ती नाराज दिसत आहे", "ही तर जुन्या काळातली हिरोईन वाटत आहे" अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :नितू सिंगरिद्धिमा कपूरसेलिब्रिटी