Join us

Exclusive : रिचा म्हणते, 100 कोटी दिले तरी ती Big Bossमध्ये जाणार नाही, वाचा काय आहे कारण

By गीतांजली | Updated: September 11, 2018 15:09 IST

रिचा चड्ढाचा लव्ह सोनिया हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या रिचा बिझी आहे. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान तिला बिग बॉस संबंधीत प्रश्न विचारण्यात आला.

ठळक मुद्दे100 कोटींची ऑफर दिली तरी मी बिग बॉसच्या घरात जाणार नाहीरिचा लव्ह सोनियामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे

रिचा चड्ढाचा लव्ह सोनिया हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या रिचा बिझी आहे. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान तिला बिग बॉस संबंधीत प्रश्न विचारण्यात आला. रिचाला विचारण्यात आले सध्या बिग बॉस 12वे सीझन सुरु आहे तर तुला बिग बॉसच्या घरात जायला आवडले का स्पर्धक म्हणून ? यावर रिचा म्हणाली कोटी 100 कोटींची ऑफर दिली तरी मी बिग बॉसच्या घरात जाणार नाही. रिचाला बिग बॉसच्या घरात जायची इच्छा नाही कारण तिचे म्हणणे आहे की, माझ्यात तेवढी हिंमत नाही आणि संयम ही नाही.  बिग बॉसच्या घरात जे जातात त्यांच्यात खूप जास्त संयम आणि हिंमत असते. बिग बॉसच्या फॉर्मेटसाठी रिचा स्वत: ला योग्य समजत नाही.  

रिचा लव्ह सोनियामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातून  देह विक्री व्यवसायातील भीषण वास्तवाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मृणाल ठाकूर या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतेय. तिने यात सोनिया नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. बहीणीचा शोध घेत घेत ती स्वत: देहविक्री व्यवसायाच्या दलदलीत फसते. रिचा आणि मृणालशिवाय मनोज वाजपेयी, राजकुमार राव, अनुपम खेर, फ्रीडा पिंटो आणि आदिल हुसैन यांच्यादेखील यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.अनुपम खेर आणि मनोज वाजपेयी यात एका सरप्राईज पॅकेजमध्ये दिसणार असल्याचे भासते. दोघांनीही निगेटीव्ह भूमिका साकारली आहे.  येत्या १४ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

रिचा लवकरच बायोपिकमध्ये देखील दिसणार आहे. 1991 मध्ये सिल्क स्मितासोबत 'प्लेगर्ल्स' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री शकीला खान हिच्या आयुष्यावर बायोपिक येतो आहे.

टॅग्स :रिचा चड्डालव्ह सोनिया