Join us
Daily Top 2Weekly Top 5

अली फजलने 'मिर्झापूर'च्या दुसऱ्या सीझनबाबत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 18:52 IST

'मिर्झापूर' ही वेबसीरिज अॅमेझॉन प्राईमवर नुकतीच दाखल झाली आहे आणि या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

ठळक मुद्दे'मिर्झापूर'चा दुसरा सीझन २०१९मध्ये येणारअली फजल दिसणार गँगस्टरच्या भूमिकेत

'मिर्झापूर' ही वेबसीरिज अॅमेझॉन प्राईमवर नुकतीच दाखल झाली आहे आणि या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या सीरिजचा दुसरा सीझन येणार का व कधी, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. याबाबतचा खुलासा या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता अली फजलने केला आहे.

अली फजल म्हणाला की, 'मिर्झापूरचा दुसरा सीझन येणार आहे. हा सीझन २०१९मध्ये प्रदर्शित होईल. यात तो गँगस्टरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.'त्याने पुढे सांगितले की, 'मला आशा आहे की पुढील वर्षाच्या सुरूवातीला आम्ही तुम्हाला मिर्झापूरच्या दुनियेत पुन्हा घेऊन जावू. मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनपूर्वी मला माझ्या काही प्रोजेक्टचे काम पूर्ण करायचे आहे. त्यानंतरच सीझन २ला हात घालणार आहे.''मिर्झापूर' या सीरिजची कथा बळी तो कान पिळी हा न्याय चालणाऱ्या मिर्झापूर या मध्य भारतातील जागी घडते. ही कथा अमली पदार्थ, शस्त्र आणि सत्तेचे राजकारण याभोवती फिरणारी आहे.  या वेबसीरिजचे सगळे चित्रीकरण हे वाराणसीमध्ये झाले आहे. करण अंशुमन आणि पुनीत कृष्णा यांची निर्मिती असलेली व गुरमित सिंग यांनी दिग्दर्शित केलेली 'मिर्झापूर' ही नऊ भागांची मालिका १६ नोव्हेंबरपासून २००हून अधिक देश तसेच प्रदेशात केवळ प्राइम व्हिडिओवर दाखल झाली आहे. यात पंकज त्रिपाठी, विक्रांत मेसी, दिव्येंदु शर्मा, रसिका दुग्गल, श्रिया पिळगांवकर व श्वेता त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत.मिर्झापूरचा दुसरा सीझन कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.  

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजश्रिया पिळगावकर