Join us
Daily Top 2Weekly Top 5

खुलासा! पत्नीला कधी कधी माधुरी म्हणून हाक मारायचे अनिल कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 14:36 IST

सलमानच्या 'दस का दम' मध्येही या सिनेमातील कलाकार गेले होते. त्यावेळी अनिल कपूर यांनी याआधी कधीही न केलेला खुलासा केलाय.

मुंबई : सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या आगामी रेस 3 सिनेमात अभिनेते अनिल कपूर हे महत्वाची भूमिका साकारणार आहे. सध्या या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरु असून त्यासाठी या सिनेमाची टिम वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत. सलमानच्या 'दस का दम' मध्येही या सिनेमातील कलाकार गेले होते. त्यावेळी अनिल कपूर यांनी याआधी कधीही न केलेला खुलासा केलाय.

'दस का दम' या शोमध्ये सलमान खानने एक प्रश्न विचारला की, किती टक्के भारतीय आपल्या पार्टनरला दुसऱ्याच नावाने हाक मारतात? यावर अनिल कपूर याने काही जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, 'कधी कधी ते त्यांची पत्नी सुनीता यांना माधुरीच्या नावाने हाक मारायचे'. अनिल कपूर यांचं हे उत्तर ऐकून प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. 

(Image Credit: Bollywoodlife)

पुढे ते  आपल्या पत्नीचं कौतुक करत म्हणाले की, 'सुनीता कधीही या गोष्टीमुळे नाराज झाली नाही. कारण तिला माझ्या प्रोफेशनबाबत चांगलंच माहीत होतं. तिने नेहमी मला सपोर्ट केला'.

90 च्या दशकात अभिनेते अनिल कपूर यांनी धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं. तेव्हाची ही सर्वात सुपरहिट जोडी होती. त्यांनी 'तेजाब', 'बेटा', 'राम लखन', 'किशन कन्हैया', 'पुकार', 'हिफाजत', 'परिंदा', 'खेल', 'जमाई राजा', 'राजकुमार', 'प्रतिकार' यांसारख्या सिनेमात एकत्र काम केलं.  

टॅग्स :अनिल कपूरमाधुरी दिक्षितसलमान खानबॉलिवूड