Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेमो डिसूजाच्या पत्नीतील हा बदल बघाल तर थक्क व्हाल, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 11:58 IST

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजाची पत्नी लिजेल डिसूजा हिला आत्ता बघाल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. होय, दोन वर्षांपूर्वी लिजेलने वजन कमी करण्याचे आव्हान स्वीकारले आणि तिने ते पूर्ण करून दाखवले.

ठळक मुद्देरेमो सध्या त्याचा आगामी सिनेमा स्ट्रीट डान्सरच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजाची पत्नी लिजेल डिसूजा हिला आत्ता बघाल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. होय, दोन वर्षांपूर्वी लिजेलने वजन कमी करण्याचे आव्हान स्वीकारले आणि तिने ते पूर्ण करून दाखवले. दोन वर्षे प्रचंड मेहनत करून लिजेलने स्वत:चे वजन कमी केले. तिच्यातील बदल थक्क करणारा आहे. लिजेलने एक कोलाज इमेज पोस्ट करून, पती रेमो, दोन्ही मुले आणि ट्रेनरचे आभार मानले आहेत.

हा प्रवास अद्भूत होता. या प्रवासात मला सतत सकारात्मक राहण्यासाठी, मला प्रेरणा देण्यासाठी सर्वांचे आभार. विशेषत: माझा ट्रेनर त्याचे मी मनापासून आभार मानेल. त्याच्याशिवाय हा बदल शक्यचं नव्हता. रेमोनेही मला सतत प्रोत्साहन दिले. या काळात माझे मूड स्विंग, माझी चीडचीड सगळे काही त्याने सहन केले. माझ्या दोन्ही मुलांनीही मला सतत प्रेरणा दिली, असे लिजेलने लिहिले आहे.

 गत जुलै महिन्यात रेमोने इन्स्टाग्राम अकाउंटवर लिजेलचा एक कोलाज फोटो शेअर केला होता. त्यातील लिजेलचा एक फोटो 7 महिन्यांपूर्वीचा होता तर दुसरा फोटो जुलै महिन्यातला.‘ही ती गोष्ट आहे ज्याला तुम्ही डेडिकेशन म्हणू शकता. मला तुझा अभिमान वाटतो. तु हे सिद्ध करून दाखवलंस की,  IMPOSSIBLE चा अर्थ असतो I M POSSIBLE. अशीच मला नेहमी प्रेरणा देत राहा आणि प्रेम करत राहा,’ असे त्याने लिहिले होते.

 रेमो आणि लिजलचे लव्ह मॅरेज असून ते एका डान्स ग्रुपमध्ये होते आणि बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करत होते. सुरुवातीला असलेली मैत्री नंतर प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्न केलं. आता त्यांना दोन मुलं आहेत.

रेमो सध्या त्याचा आगामी सिनेमा स्ट्रीट डान्सरच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमात वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि नोरा फतेही यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा रेमोच करत आहे.

टॅग्स :रेमो डिसुझा