Join us

रिलीजच्या आधीच प्रभासच्या 'साहो'ने मोडला 'बाहुबली2' चा रेकॉर्ड, कसं ते वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 16:29 IST

'बाहुबली 2' च्या रिलीजनंतर दोन वर्षांनी प्रभास साहोसोबत सिल्वर स्क्रिनवर परततो आहे.

'बाहुबली 2' च्या रिलीजनंतर दोन वर्षांनी प्रभाससाहोसोबत सिल्वर स्क्रिनवर परततो आहे. साहो नॉर्थ इंडियामध्ये 4500 स्क्रिनवर रिलीज करण्यात येणार आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार रिलीज आधीच साहोने बाहुबली 2 चे रेकॉर्ड तोडला आहे. साहो तामिळनाडूमध्ये जवळपास 550 स्क्रिनवर रिलीज होतो आहे. या आधी 'बाहुबली 2'  525 स्क्रिनवर रिलीज करण्यात आला होता.

मेकर्स साहोला हिट करण्यासाठी कोणतीच कसर सोडू इच्छित नाही.  साहोने रिलीज आधीच 320 कोटींची कमाई केली आहे. रिपोर्टनुसार मेकर्सनी साहोचे थियेट्रिकल राईट्स 320 कोटींना विकले आहेत. मेकर्सनी साहोचे सेटलाईट राईट्स विकलेले नाहीत.  साहोकडे 2019 मधला सर्वात बिग बजेट सिनेमा म्हणून पाहिलं जातंय.

सध्या प्रभास आणि श्रद्धा साहोच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. या सिनेमात काम करण्यासाठी  प्रभास आणि श्रद्धा कपूरने भलीमोठी रक्कम आकारली आहे.  रिपोर्टनुसार प्रभासने 100 कोटींचे मानधन घेतल्याची माहिती आहे. या मानधनासोबत प्रभास फिल्म इंडस्ट्रीमधील सगळ्यात महागडा स्टार बनला आहे. प्रभासचे यात दमदार अॅक्शन सीन्स बघायला मिळणार आहेत. एक अॅक्शन शूट करण्यासाठी जवळपास 70 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. प्रभास त्याच्या या सिनेमासाठी चांगलीच मेहनत घेतली आहे.

सिनेमाचे दिग्दर्शक सुजीत ही प्रत्येक अ‍ॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष दिले आहे. प्रत्येक सीनमध्ये प्रभास अतिशय प्रभावशाली दिसला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत.साहो हा सिनेमा भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये हा शूट केला गेला आहे.   

टॅग्स :साहोप्रभास