Join us
Daily Top 2Weekly Top 5

या कारणामुळे श्रद्धाने केले इंस्टाग्रामवरील फोटो डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 12:32 IST

श्रद्धाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फक्त तीन फोटोज आहेत आणि लिहिले आहे की, 'मर्द को दर्द होगा'.

ठळक मुद्देश्रध्दा कपूर आगामी चित्रपट 'स्त्री'मध्ये साकारतेय प्रमुख भूमिका 'स्त्री'मध्ये राजकुमार राव प्रमुख भूमिकेत श्रद्धाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फक्त चार फोटो

बॉलिवूडमधील कलाकार सध्या सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत. ते त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल व विविध गोष्टी चाहत्यांना सोशल मीडियावरून सांगत असतात किंवा संवादही साधत असतात. त्यामुळे त्याचे चाहते इन्स्टाग्राम, फेसबुक व ट्विटर या सोशल माध्यमावर लक्ष ठेवून असतात. बॉलिवूडची आशिकी गर्ल म्हणजेच अभिनेत्री श्रध्दा कपूर हिने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवरील सर्व फोटोज डिलीट केले आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिने फोटो डिलीट का केले असावेत असा प्रश्न पडला आहे.

श्रद्धाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फक्त चार फोटोज आहेत. यावर लिहिले आहे की, 'मर्द को दर्द होगा'. हे पाहून चाहते गोंधळले आहेत. त्यांना वाटले अचानक असे काय झाले? अनेकांना वाटले की, तिचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. परंतू असे काहीच झालेले नाही. हे सर्व नियोजनबध्द पद्धतीने करण्यात आले आहे. श्रध्दा कपूर आगामी चित्रपट 'स्त्री'मध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. राजकुमार राव तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपट साइन करताना करार झाला होता की, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार आपले सोशल मीडिया अकाउंट पुर्णपणे डेडिकेट करतील. यामुळे श्रद्धाने सोशल मीडियावरील आपले फोटो डिलीट केले आहेत. 'मर्द को दर्द होगा' ही चित्रपटाची टॅगलाइन असल्यामुळे श्रद्धाने टॅगलाइन शेअर केली आहे. हा चित्रपट 31 ऑगस्टला रिलीज होणार आहे. अमर कौशिक या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. यामध्ये भोपाळच्या लहानश्या गावातील चंदेरी कथा सांगण्यात आली आहे.  श्रध्दा लवकरच शाहिद कपूर आणि यामी गौतमसोबत 'बत्ती गुल मीटर चालू'मध्ये दिसणार आहे. या सिनेमाची शूटिंग नुकतीच संपली आहे. आता श्रद्धा सोशल मीडियावर आणखीन काय पोस्ट करते हे पाहणे कमालीचे ठरेल. 

टॅग्स :श्रद्धा कपूरराजकुमार राव