Join us

नुकतीच आजी बनलेल्या या अभिनेत्रीने केले हॉट फोटोशूट, बोल्ड ड्रेसमध्ये दिसला ग्लॅमरस अवतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 12:30 IST

90चे दशक गाजवणारी ही अभिनेत्री नुकतीच आजी झाली.

ठळक मुद्देमोहरा, लाडला, दिलवाले, अंदाज अपना अपना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या.

90चे दशक गाजवणारी अभिनेत्री रवीना टंडन नुकतीच आजी झाली. गत सप्टेंबर महिन्यात रवीनाची मुलगी छाया हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. छाया ही रवीनाची दत्तक मुलगी आहे. 1995 मध्ये रवीनाने छायाला दत्तक घेतले होते. आजी झाल्याची बातमी खुद्द रवीनाने चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता रवीनाने तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.  

45 वर्षांच्या रवीनाने नुकतेच एक फोटोशूट केले.  ब्लॅक कलरच्या ड्रेसमधील तिचा ग्लॅमरस अवतार थक्क करणारा आहे.  ‘नच बलिए 9’च्या ग्रँड फिनालेला रवीनाने हा लूक कॅरी केला होता. याच लूकमधील तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या वयातही रवीना कमालीची सुंदर दिसतेय.

रवीनाने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. आजही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते.

मोहरा, लाडला, दिलवाले, अंदाज अपना अपना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या. ‘मोहरा हा  तिचा चित्रपट सुपरहिट ठरला. यातील ‘तू चीज बडी है मस्त मस्त...’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. याच गाण्यामुळे बॉलिवूडची ‘मस्त मस्त गर्ल’ म्हणून रवीना ओळखली जाऊ लागली.

22 फेबु्रवारी 2004 रोजी रवीनाने फिल्म डिस्ट्रीब्युटर अनिल थडानीसेबत लग्न केले. या दोघांना 14 वर्षांची मुलगी राशा आणि 11 वर्षांचा मुलगा आहे. १९९५ मध्ये तिने दोन मुलींना दत्तक घेतले होते.

पूजा आणि छाया असे त्यांचे नाव होते. त्यावेळी पूजा ११ वर्षांची होती तर छाया ८ वर्षांची. रवीनाने या मुलींना दत्तक घेतले तेव्हा ती सिंगल होती. आता तर छायाचे लग्न झाले असून तिने काहीच महिन्यांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.  

टॅग्स :रवीना टंडन