Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बाबा का ढाबा’च्या मदतीसाठी रविना टंडन,सुनिल शेट्टीसह इतर सेलिब्रेटी आले पुढे, इतरांनाही केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 14:43 IST

दिल्लीतील मालवीय नगर येथे ही खानावळ आहे. कोणीही त्यांच्या या छोटेखानी खानावळमध्ये येत नाही. त्यामुळे त्यांना प्रचंड आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. व्यवसाय होत नसल्यामुळे रडताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर एक वृ्द्ध जोडपे 'बाबा का ढाबा' नावाने छोटे खानावळ चालवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.दिल्लीतील मालवीय नगर येथे ही खानावळ आहे. कोणीही त्यांच्या या छोटेखानी खानावळमध्ये येत नाही. त्यामुळे त्यांना प्रचंड आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. व्यवसाय होत नसल्यामुळे रडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय.

 

व्हिडीओ पाहून अनेकांनी मदत करण्याचे आवाहन केले आहे. यात आता सेलिब्रेटीमंडळीही पुढे येत आहेत. या वयातही वृदद्ध दाम्पत्य व्यवासाय करत आहेत. मात्र त्यांच्याव्यवसायला आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे नेटीझन्स हा व्हिडीओ अधिकाधिक शेअर करत आहेत. 

अभिनेत्री रविना टंडननेही हा व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर करत चाहत्यांनाही 'बाबा का ढाबा'ला एकदा तरी भेट देण्याचे आवाहन केले आहे. तसेच जो कोणी येथे जेवेल त्याने त्याचा 'बाबा का ढाबा' सह एक फोटो काढून रवीनाला पाठवायचा आहे. पुढे तो फोटो ती सोशल मीडियावर शेअर करणार असून त्याचसोबत तुमच्यासाठी एक खास मेसेजदेखील पाठवणार असल्याचे रविनाने म्हटले आहे.

रवीनाप्रमाणे सोनम कपूर, स्वरा भास्कर, सुनील शेट्टी हे कलाकारदेखील 'बाबा का ढाबा'च्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सोशल मीडियावर त्यांनीही हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांसह शेअर करत इतरांनाही मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. 

OMG! रवीना टंडनला ‘देव’ मानतो हा पठ्ठा; शरीरावर लिहिले, रवीना इज माय गॉड !!

रवीना सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या चाहत्यांसाठी ती रोज नवे व्हिडीओ, फोटो शेअर करते मध्यंतरी  तिने दोन खास व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले होते. हे दोन्ही व्हिडीओ तिच्या फॅन्सचे होते.या व्हिडीओत रवीनाच्या फॅन्सनी तिला गराडा घातला आहे. या गर्दीतला एक चाहता सर्वात खास आहे, होय, तो रवीनाला चक्क देव मानतो, या चाहत्याने काय करावे तर आपल्या शरीरावर रवीनाचे नाव लिहून कडक उन्हात तो तिची प्रतीक्षा करतोय. रवीना इज माय गॉड, असे त्याने शरीरावर लिहिले आहे.

टॅग्स :रवीना टंडनसोनम कपूर