Join us

रवीना टंडन लग्नाच्या आधीच बनली होती दोन मुलींची आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 15:48 IST

रवीनाचे लग्न व्हायच्याआधीच तिला दोन मुली होत्या ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?

ठळक मुद्दे१९९५ मध्ये तिने दोन मुलींना दत्तक घेतले होते. पूजा आणि छाया असे त्यांचे नाव होते. त्यावेळी पूजा ११ वर्षांची होती तर छाया ८ वर्षांची. रवीनाने या मुलींना दत्तक घेतले तेव्हा ती सिंगल होती.

रवीना टंडनचा आज म्हणजेच 26 ऑक्टोबरला वाढदिवस असून रवीनाने वयाची चाळीशी ओलांडली असली तरी आजही ती तितकीच फिट आहे. तिच्या सौंदर्यावर आजही तिचे फॅन्स फिदा आहेत. रवीनाने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले असून बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. मोहरा, लाडला, दिलवाले, अंदाज अपना अपना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मोहरा हा तर तिचा चित्रपट सुपरहिट ठरला. यातील ‘तू चीज बडी है मस्त मस्त...; हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. याच गाण्यामुळे बॉलिवूडची ‘मस्त मस्त गर्ल’ म्हणून रवीना ओळखली जाऊ लागली.

रवीनाचे लग्न व्हायच्याआधीच तिला दोन मुली होत्या ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? १९९५ मध्ये तिने दोन मुलींना दत्तक घेतले होते. पूजा आणि छाया असे त्यांचे नाव होते. त्यावेळी पूजा ११ वर्षांची होती तर छाया ८ वर्षांची. रवीनाने या मुलींना दत्तक घेतले तेव्हा ती सिंगल होती. आता तर छायाचे लग्न झाले असून तिने काहीच महिन्यांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे इतक्या कमी वयात रवीना आजीदेखील बनली आहे. 

रवीनाने २००४ मध्ये अनिल थडानीसोबत लग्न केले. २००५ मध्ये तिने मुलगी राशाला जन्म दिला. यानंतर तीन वर्षांनंतर रवीनाचा मुलगा रणबीरवर्धनचा जन्म झाला. सध्या रवीना ‘नच बलिये’ या रिअ‍ॅलिटी डान्स शोमध्ये परिक्षकाची भूमिका साकारते आहे.

रवीनाच्या वडिलांचे नाव रवि टंडन तर आईचे नाव वीणा टंडन. याच दोघांची नावे मिळून रवीनाचे नाव ठेवण्यात आले. रवीनाचे वडील एक नामवंत चित्रपट निर्माते होते. रवीना कॉलेजमध्ये असताना तिची ओळख दिग्दर्शक शांतनु शोरी यांच्याशी झाली. शांतनु यांनी रवीनाला बॉलिवूडमध्ये येण्याचा सल्ला दिला आणि याचमुळे कॉलेज सोडून रवीनाने बॉलिवूडची वाट धरली. ‘पत्थर के फूल’ या चित्रपटाद्वारे रवीनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात सलमान खान तिचा हिरो होता. हा चित्रपट दणकून आपटला. पण यातील रवीनाच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले.

टॅग्स :रवीना टंडन