Join us
Daily Top 2Weekly Top 5

रसिका सुनीलच्या बिकनीतील सेक्सी अदा पाहून व्हाल फिदा, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 07:15 IST

रसिका सुनील आपल्या ग्लॅमरस व बोल्ड अदांनी रसिकांना घायाळ करत असते.

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री रसिका सुनील हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. रसिकाने नुकताच बिकनीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोने सोशल मी़डियावर खळबळ माजवली आहे.

अभिनेत्री रसिका सुनीलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फ्लोरल प्रिंट असलेली बिकनीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच बोल्ड व ग्लॅमरस दिसते आहे. या फोटोंवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. या फोटोत तिच्या अंगावर सावली पडलेलीही दिसते आहे.

यापूर्वीदेखील तिने सोशल मीडियावर काळ्या रंगाच्या बिकनीतील फोटो शेअर केला होता. या फोटोलाही प्रेक्षकांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

पुढील शिक्षणासाठी रसिका अमेरिकेत गेली आहे. तिथे ती शिक्षणासोबत विविध गोष्टी करताना पहायला मिळते. ती सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना तिथले अपडेट्स देत असते. नुकतेच तिने स्कुबा डायविंगचे प्रशिक्षण घेतले आणि तिला स्कुबा डायविंगचचे प्रमाणपत्र देखील मिळाले. त्यामुळे आता ती जगात कुठेही स्कुबा डाइव करू शकते. स्कुबा डायविंगच्या कोर्सनंतर रसिकाला व्रेक डायविंग आणि नाईट डायविंगचेही प्रशिक्षण घ्यायचे आहे आणि ती लवकरच घेणार असल्याचे ती सांगते.

रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली.

मालिकेत तिची निगेटीव्ह भूमिका असली तरी आपल्या खास अंदाजात तिने ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिेकला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती.

तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना चांगलाच भावला होता. मात्र पुढील शिक्षणासाठी शनाया अर्थात रसिकाने ही मालिका सोडली आणि ती अमेरिकेत गेली.

टॅग्स :रसिका सुनिल