Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनफ्लावर टॉप आणि व्हाइट स्कर्ट परिधान करत अभिनेत्रीने केले भन्नाट फोटोशूट, वारंवार पाहिले जातायेत तिचे हे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2020 15:50 IST

'नागीन 4' मध्ये रश्मी देसाईने तिच्या भूमिकेने बरीच मने जिंकली होती. रश्मी देसाई यापूर्वी 'बिग बॉस 13' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई नेहमीच आपल्या स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. नेहमीट तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.रश्मीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर तिचे हे फोटो लक्षवेधी ठरत आहेत. हटके आणि भन्नाट आयडियाची कल्पना लढवत केलेल्या फोटोशूटमध्ये रश्मी ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोज करताना दिसत आहे. रश्मी देसाईच्या या व्हिडिओमध्ये तिची क्रिएटीव्हीटी पाहण्यासारखी आहे. रश्मी देसाईने एक व्हिडिओही शेअर केला आहे. व्हिडीओवर चाहत्यांचे प्रचंड लाईक्स आणि कमेंटस पाहायला मिळत आहेत.

रश्मी देसाई तिच्या व्हिडिओमध्ये सूर्यफूल टॉप आणि व्हाइट स्कर्टमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये तिचा लूक खरोखरच अप्रतिम दिसत आहे. याशिवाय फोटोशूट दरम्यान रश्मी देसाईने दिलेल्या पोज पाहून चाहतेही घायाळ होत आहेत. व्हिडिओशिवाय रश्मी देसाईच्या या फोटोशूटमधले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, पहिल्यांदाच रश्मीने असे फोटोशूट केले आहे असे नाही. याआधीही तिने फोटोशूट करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

'नागीन 4' मध्ये रश्मी देसाईने तिच्या भूमिकेने बरीच मने जिंकली होती. रश्मी देसाई यापूर्वी 'बिग बॉस 13' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. पहिल्यांदाच एक कलाकार म्हणून नाही तर ख-या आयुष्यात ती कशी आहे.या शोच्या माध्यमातून तिला रसिकांना अनुभवता आले होते. बिग बॉसच्या घरात असताना रश्मी तिच्या कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असायची. सतत हेडलाइन्समध्ये ती झळकायची. पब्लिसिटी कशी मिळवता येईल यासाठी तिने कोणतीही कसर सोडली नव्हती. रश्मी देसाईला खरी ओळख 'उतरन' मालिकेतून मिळाली होती.यानंतर रिएलिटी टीव्ही शोच्या माध्यमातून रसिकांना तिचे दर्शन घडत राहिले. 

रश्मि देसाई या आजाराने त्रस्त, त्यामुळेच झाली तिची अशी अवस्था

अमर उजालाच्या रिपोर्टनुसार गेल्या काही महिन्यांपासून रश्मिला सोरायसिसचा त्रास होत आहे. याच कारणामुळे तिने घरातून बाहेर निघणेच बंद केले होते. तिचे वजनही वाढले होते. त्वचेला जराही उष्णता लागू नये म्हणून तिने घरातच राहणे पसंत केले होेत. यावर सध्या ती उपचार घेत आहे. ही समस्या ताणतणावामुळे जास्त वाढते. या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये दिसण्याला अधिक महत्त्व असते कलाकारासाठी चेहराच सर्वकाही असतो.

कोणत्याही गोष्टीमुळे तणाव येणार नाही. या सगळ्यांंपासून लांब राहिले तर रिलॅक्स राहता येईल. त्यामुळे फक्त स्वतःची काळजी घेण्यात व्यस्त होते. सोरायसिसमुळे तब्येत खराब झाली होती. आता तब्येतीत थोडी सुधारणा होत आहे. तसेच वाढलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिने म्हटले आहे.

टॅग्स :रश्मी देसाई