छोट्या पडद्याची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाई आज म्हणजे 13 फेब्रुवारीला आपला वाढदिवस साजरा करते आहे. रश्मी केवळ टीव्ही इंडस्ट्रीमध्येच नाही तर भोजपुरी इंडस्ट्रीमध्येही खूप लोकप्रिय आहे. रश्मी तिच्या कामामुळे पेक्षा वैयक्तिक आयुष्याला घेऊन जास्त चर्चेत राहिली आहे.
अभिनेता नंदिश संधू आणि रश्मी 5 वर्षात विभक्त झाले. दोघांच्या घटस्फोटोच्या बातमीने बर्याच सेलेब्रिटींना आश्चर्याचा धक्का बसला होता. करिअर पिकवर असताना रश्मीने अभिनेता नंदीश संधूसोबत लग्नगाठ बांधली. ‘उतरण’ या मालिकेच्या सेटवर रश्मी व नंदीश जवळ आलेत आणि दोघांत प्रेम फुलले. पुढे दोघांचे लग्न झाले. पण वर्षभरातच या रश्मी व नंदिशच्या कुरबुरीच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. पण पुढे एकत्र राहणे कठीण झाले आणि लग्नाच्या चार वर्षांनंतर रश्मी व नंदीश विभक्त झालेत.
घटस्फोटानंतर काही दिवसांनी रश्मीला घटस्फोटाचे खरे कारण विचारले गेले तेव्हा तिने सांगितले की नंदीशची मैत्री बर्याच मुलींशी आहे. नंदीशला घेऊन रश्मी अत्यंत संवेदनशील होती, जे नंदीशला फारसे आवडायचे नाही. नंदीशचे म्हणणे होते त्याने हे नातं वाचवण्याचा खूप प्रयत्न केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा रश्मीचा गर्भपात झाले तेव्हा दोघांमध्ये कटुता निर्माण झाली.