प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंग सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आहे. दिल्लीतील एका कॉन्सर्टदरम्यान त्याने केलेल्या काही आक्षेपार्ह वक्तव्यांनंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. या वादावर आता हनी सिंगने अधिकृतपणे माफी मागितली असून आपली बाजू स्पष्ट केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
काही दिवसांपूर्वी दिल्लीत 'नानकू' आणि 'करुण' यांच्या कॉन्सर्टमध्ये हनी सिंग पाहुणा म्हणून गेला होता. यावेळी स्टेजवर बोलताना त्याने दिल्लीतील थंडीचा उल्लेख करत काही अश्लील आणि आक्षेपार्ह शब्द वापरले होते. याशिवाय त्याने 'सेफ सेक्स'वरही भाष्य केलं. त्यावेळी त्याने वापरलेली भाषा अनेक नेटकऱ्यांना आवडली नाही, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची झोड उठली.
हनी सिंगने काय स्पष्टीकरण दिले?
गुरुवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत हनी सिंग म्हणाला की, "माझा कोणालाही दुखवण्याचा किंवा कोणाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. त्या कार्यक्रमात उपस्थित असलेली 'जेन झी' (Gen Z) पिढी पाहून मला त्यांना सुरक्षित शरीरसंबंधांबाबत आणि कंडोमच्या वापराबाबत संदेश द्यायचा होता."
त्याने पुढे सांगितले की, "काही दिवसांपूर्वी मी काही स्त्रीरोगतज्ज्ञ आणि तज्ज्ञांशी चर्चा केली होती, ज्यांनी तरुणांमध्ये वाढणाऱ्या लैंगिक आजारांबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यामुळेच मी तरुणांना त्यांच्याच भाषेत समजावण्याचा प्रयत्न केला. पण माझी भाषा अनेकांना खटकली, ज्याबद्दल मी मनापासून माफी मागतो." असा व्हिडीओ करत पुन्हा अशी चूक न करण्याची खात्री हनी सिंगने आपल्या व्हिडिओमध्ये दिली आहे.
याशिवाय सार्वजनिक ठिकाणी बोलताना भाषेवर नियंत्रण असणे गरजेचे आहे, याची त्याला जाणीव झाली आहे. त्याने म्हटले, "माणूस हा चुकांचा पुतळा असतो. माझ्याकडून ही चूक झाली आहे आणि मी प्रयत्न करेन की भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही. मी माझ्या बोलण्यावर आणि शब्दांवर नियंत्रण ठेवेन." सोशल मीडियावर काही चाहत्यांनी त्याची ही माफी स्वीकारली आहे, तर काहींनी सेलिब्रिटींनी जाहीर व्यासपीठावर बोलताना भाषेचा वापर काळजीपूर्वक करावा, असा सल्ला दिला आहे.
Web Summary : Rapper Honey Singh apologized after facing criticism for using inappropriate language at a Delhi concert. He claimed his intention was to educate Gen Z about safe sex but acknowledged his mistake and vowed to be more careful with his words in the future.
Web Summary : दिल्ली में एक संगीत कार्यक्रम में अनुचित भाषा का उपयोग करने के लिए आलोचना का सामना करने के बाद रैपर हनी सिंह ने माफी मांगी। उन्होंने दावा किया कि उनका इरादा जेन जेड को सुरक्षित यौन संबंध के बारे में शिक्षित करना था, लेकिन उन्होंने अपनी गलती स्वीकार की और भविष्य में अपने शब्दों के साथ अधिक सावधान रहने का वादा किया।