Join us

बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 10:54 IST

रणवीर सिंह आणि दीपिकाच्या लेकीचं नाव 'दुआ' असं ठेवण्यात आलं आहे.

दीपिका पदुकोण (Deepika Padukone)  आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) दोन महिन्यांपूर्वीच आई बाबा झाले. दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव 'दुआ' असं ठेवण्यात आलं. सध्या सोशल मीडियावर रणवीर-दीपिकाच्या लेकीच्या नावाचीच चर्चा आहे. अनेकांना मात्र हे नाव पसंतीस पडलं नाही आणि त्यांनी ट्रोल केलं. दरम्यान लेकीचं नाव जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच रणवीर सिंह एका इव्हेंटमध्ये दिसला. तिथे त्याने बाबा झाल्याचा आनंद शब्दात व्यक्त केला.

नुकताच मुंबईत एक इव्हेंट पार पडला. यामध्ये रणवीर सिंहने हजेरी लावली. यावेळी त्याने स्टेजवर येत चाहत्यांचं मनोरंजन केलं. तसंच तो आयुष्यातील या नव्या इनिंगविषयीही बोलला. रणवीर म्हणाला, "मी आता बऱ्याच दिवसांपासून डॅडी ड्युटी वर आहे. सध्या मी जो आनंद अनुभवत आहे तो शब्दात व्यक्त करताच येत नाहीए. पण हा आनंद शब्दात सांगणारी कोणतीच भाषा नाही. जेव्हा तुम्हाला दु:ख होतं ते जर तुम्ही शेअर केलं तर ते कमी होतं.  आणि जर तुम्हाला आनंद झाला असेल आणि तो तुम्ही शेअर केलात तर तो दुप्पट होतो. हे जादुसारखंच आहे."

सध्या दीपिका आपल्या बाळासोबत बंगलोरमध्ये आई वडिलांच्या घरी आहे. काही दिवसांपूर्वीच रणवीर-दीपिका दुआला घेऊन बंगलोर गेले. तेव्हा विमानतळावर त्यांची झलक पाहायला मिळाली होती. डिलीव्हरीनंतर दीपिका अद्याप कॅमेऱ्यासमोर आलेली नाही. ती बाळाच्या संगोपनात व्यस्त आहे.'सिंघम अगेन'च्या ट्रेलर लाँचलाही ती गैरहजर होती. लेकीच्या जन्मानंतर दीपिकाने ब्रेक घेतल्याची चर्चा आहे.

टॅग्स :रणवीर सिंगसोशल मीडियापरिवार