Join us

अजय गोगावलेने गायलं 'देवा श्री गणेशा', रणवीर सिंहने फुल एनर्जीसह केला डान्स; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 14:07 IST

अंबानी कुटुंबाच्या गणेशोत्सवाला रमवीर-दीपिकाने हजेरी लावली. यावेळी रणवीर फुल ऑन एनर्जीसह गणपती डान्स करताना दिसला.

अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण बॉलिवूडमधली सर्वात लाडकी जोडी. दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या घरी एका गोंडस परीचं आगमन झालं. 'दुआ' असं तिचं नाव ठेवण्यात आलं. लेकीच्या जन्मानंतर दीपिका पादुकोण खूप कमी वेळा सार्वजनिक ठिकाणी दिसली. तर दुसरीकडे रणवीर सिंह आगामी 'धुरंधर' सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र होता. आता नुकतंच अंबानी कुटुंबाच्या गणेशोत्सवाला रमवीर-दीपिकाने हजेरी लावली. यावेळी रणवीर फुल ऑन एनर्जीसह गणपती डान्स करताना दिसला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रणवीर सिंह इतके दिवस 'धुरंधर' अवतारात दिसत होता. लांब केस, वाढलेली दाढी असा तिचा लूक होता. मात्र आता तो क्लीन शेव्ह लूकमध्ये समोर आला आहे. दीपिका आणि रणवीरने गणपतीचं दर्शन घेतलं. त्यांचा व्हिडिओ काल व्हायरल झाला होता. तर आता रणवीर सिंहचा 'देवा श्री गणेशा' गाण्यावर फुल एनर्जीसह नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एकीकडे माईकवरुन अजय गोगावले त्याचं लोकप्रिय गाणं 'देवा श्री गणेशा' गात आहे तर त्याच्या गाण्यावर रमवीर कमाल नाचताना दिसतोय. रणवीर सिंह किती एनर्जेटिक आहे ते तर सर्वांनाच माहित आहे. याचीच झलक पुन्हा एकदा दिसत आहे. पल्लव पलिवाल यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

रणवीरच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही अनेक कमेंट्स केल्या आहेत. रणवीरचे धमाकेदार डान्स मूव्ह्ज आणि त्याचं कौशल्य याचं सर्वांनी कौतुक केलं आहे. 'कोणत्याही उत्सवासाठी आमंत्रित करायला रणवीर सिंह योग्य व्यक्ती आहे त्याला आयुष्याचा आनंद घ्यायला बरोबर जमतं','रणवीर सिंह एकमेव व्यक्ती आहे तो खऱ्या अर्थाने आनंद साजरा करतो' अशा कमेंट्स आल्या आहेत. 

'धुरंधर' सिनेमाबद्दल आता उत्सुकता वाढत चालली आहे. आदित्य धरने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. रणवीर सिंहने सीक्रेट एजंटची भूमिका साकारली आहे. ५ डिसेंबर रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. आर माधवन, संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल यांचीही सिनेमात मुख्य भूमिका आहे. 

टॅग्स :रणवीर सिंगबॉलिवूडनृत्यगणेशोत्सवव्हायरल व्हिडिओ