Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीरचा 'धुरंधर' होतोय रि-रिलीज! सिनेमात करण्यात आलाय 'हा' मोठा बदल; केंद्र सरकारकडून निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:49 IST

'धुरंधर' सिनेमाची सुधारीत आवृत्ती आजपासून थिएटरमध्ये दिसणार आहे. या आवृत्तीत मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची काहीशी निराशा होऊ शकते

दिग्दर्शक आदित्य धर यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'धुरंधर' (Dhurandhar) सध्या बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. १,१०० कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटात आता मोठा बदल करण्यात आला आहे. १ जानेवारी २०२६ पासून चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाची एक 'सुधारित आवृत्ती' (Revised Version) प्रदर्शित करण्यात आली आहे. जाणून घ्या सविस्तर

'धुरंधर' होतोय रि-रिलीज, कारण...

 माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या (Ministry of Information and Broadcasting) सूचनेनंतर निर्मात्यांनी 'धुरंधर' चित्रपटातील काही शब्दांवर कात्री चालवली आहे. त्यामुळे आजपासून देशातील सर्व चित्रपटगृहांमध्ये नवीन आवृत्ती लावण्याचे निर्देश दिले. या नवीन आवृत्तीमध्ये दोन शब्द 'म्युट' करण्यात आले असून एका संवादात बदल करण्यात आला आहे.

बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार, चित्रपटातून हटवण्यात आलेल्या शब्दांपैकी एक महत्त्वाचा शब्द 'बलुच' (Baloch) हा आहे. या शब्दाचा वापर असलेल्या संवादांना म्यूट करण्यात आले आहे किंवा बदलण्यात आले आहे. राजकीय संवेदनशीलतेमुळे आणि मंत्रालयाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. त्यामुळे 'धुरंधर'च्या सुधारीत आवृत्तीमध्ये हा बदल करण्यात आला आहे.

रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने २७ व्या दिवसापर्यंत केवळ भारतात ७२० कोटींहून अधिक कमाई केली आहे. निर्मात्यांनी आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू केली असून, 'धुरंधर २' हा १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. अनेकांना वाटत होतं की, अक्षय खन्नाचे नवीन सीन्स जोडण्यासाठी या सुधारीत आवृत्तीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. पण असं नाही. एकूणच मंत्रालयाने सांगितलेले बदल लागू करण्यासाठी ही सुधारित आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ranveer's 'Dhurandhar' Re-released with Changes: Government Directives Explained

Web Summary : Aditya Dhar's blockbuster 'Dhurandhar' is being re-released with a revised version after the Information and Broadcasting Ministry directed changes. Certain words, including 'Baloch,' have been muted or altered due to political sensitivities. 'Dhurandhar 2' is slated for release on March 19, 2026.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंगअक्षय खन्नाआर.माधवनअर्जुन रामपालबॉलिवूड