Join us
Daily Top 2Weekly Top 5

राणी मुखर्जी आणि काजोलवर कोसळला दुःखाचा डोंगर, काका रोनो मुखर्जी यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 09:32 IST

Rono Mukherjee Passed Away : मुखर्जी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राणी मुखर्जी, काजोल आणि अयान मुखर्जी यांचे काका रोनो मुखर्जी यांचे निधन झाले आहे.

मुखर्जी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राणी मुखर्जी (Rani Mukherjee), काजोल (Kajol) आणि अयान मुखर्जी (Ayan Mukherjee) यांचे काका रोनो मुखर्जी (Rono Mukherjee) यांचे निधन झाले आहे. ते अभिनेत्री शर्बानी मुखर्जीचे वडील होते आणि एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक देखील होते. रोनो मुखर्जी यांनी २८ मे रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ते ८३ वर्षांचे होते. परंतु मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

रोनो मुखर्जी यांच्या निधनाची बातमी मिळताच अयान मुखर्जी आणि तनिषा त्यांच्या घरी पोहोचले. त्यांनी काका रोनो मुखर्जी यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनीदेखील हजेरी लावली. आशुतोष गोवारीकर यांचे लग्न अयानचे वडील देब मुखर्जी यांची मुलगी सुनीता यांच्याशी झाले आहे. रोनो मुखर्जी यांना अंतिम निरोप देण्यासाठी ती तिच्या पतीसोबत पोहोचली होती.

रोनो मुखर्जींचे राणी, काजोल आणि अयानसोबत आहे हे नातेरोनो मुखर्जी यांच्याबद्दल सांगायचे झाले तर, ते काजोलचे वडील शोमू मुखर्जी यांचे भाऊ होते. सुब्बीर मुखर्जी, जॉय मुखर्जी आणि देब मुखर्जी, म्हणजेच अयान मुखर्जीचे वडील हे देखील त्यांचे भाऊ होते. हे सर्व भारतीय सिनेइंडस्ट्रीचा एक महत्त्वाचे भाग होते. राणी मुखर्जीचे वडील राम यांच्याव्यतिरिक्त, श्याम मुखर्जी, गीतांजली मुखर्जी, सुभाष मुखर्जी आणि संजय मुखर्जी हे रोनो मुखर्जीचे चुलत भाऊ होते.

रोनो मुखर्जी यांची सिनेकारकिर्दमार्च २०२५ च्या सुरुवातीला, रोनो यांचा भाऊ आणि अयानचे वडील देब मुखर्जी यांचे निधन झाले. ते एक प्रसिद्ध अभिनेते होते. रोनो मुखर्जी यांच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, त्यांनी १९७७ मध्ये 'हैवान' आणि त्यापूर्वी १९६५ मध्ये प्रदर्शित झालेला 'तू ही मेरी जिंदगी' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

टॅग्स :राणी मुखर्जीकाजोल