Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेश्मानंतर 'रंग माझा वेगळा'मधील आणखी एका अभिनेत्रीने गुपचूप केलं लग्न, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:01 IST

रेश्माच्या पाठोपाठ 'रंग माझा वेगळा'मधील आणखी एका अभिनेत्रीने लग्नाचा बार उडवून दिला आहे. 

सध्या सगळीकडेच लग्नाचा माहौल आहे. कलाविश्वात सनई चौघडे वाजत आहेत. अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. काही दिवसांपूर्वीच रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेने लग्नाच्या बेडीत अडकत पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात केली. आता रेश्माच्या पाठोपाठ 'रंग माझा वेगळा'मधील आणखी एका अभिनेत्रीने लग्नाचा बार उडवून दिला आहे. 

'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री सोनाली साळुंखे हिने लग्नगाठ बांधली आहे. सोनाली २४ डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकली. धुळे येथे तिचा लग्नसोहळा पार पडला. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत तिने पतीसोबत सात फेरे घेत रेशीमगाठ बांधली आहे. लग्नाचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी सोनालीला शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनालीने 'रंग माझा वेगळा' मालिकेत अनिताची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने आणखी काही मालिकांमध्ये काम केलं आहे. छोट्या बयोची मोठी गोष्ट, गाथा नवनाथांची, क्राइम पेट्रोल या मालिकांमध्येही ती झळकली आहे. एप्रिलमध्ये सोनालीने साखरपुडा केला होता. आता लग्नाच्या बेडीत अडकत तिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रेटी वेडिंग