Join us

रणबीर कपूर करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण? जेम्स बाँड सीरिजमध्ये वर्णी लागल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:24 IST

Ranbir Kapoor Hollywood Debut: रणबीर कपूरचे चाहते खूश, हॉलिवूडमध्येही धमाका करणारा सर्वांचा लाडका अभिनेता?

Ranbir Kapoor Hollywood Debut: अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) अभिनयाची स्तुती करावी तेवढी कमीच आहे. त्याच्याकडे विलक्षण अभिनय कौशल्य आहे. तो फक्त डोळ्यांतूनही बोलू शकतो. अनके सिनेमांमधून आपण त्याचा सहज सुंदर अभिनय पाहिला आहे. 'बर्फी' सिनेमात तर त्याने मुका अभिनय केला जो आजही सर्वांच्या लक्षात आहे. आता टॅलेंटेंड अभिनेता रणबीर हॉलिवूडच्या वाटेवर निघाल्याची चर्चा आहे. जेम्स बॉन्ड सीरीजमध्ये त्याची वर्णी लागल्याची चर्चा आहे.

हॉलिवूडचे अॅक्शन मास्टर दिग्दर्शक मायकल बे यांच्या दिग्दर्शनाखाली रणबीर कपूरचं पदार्पण होणार असल्याची चर्चा आहे. मायकल बे यांनी ट्रान्सफॉर्मर्स आणि बॅड बॉइज सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. आता ते आगामी बॉन्ड सिनेमाचं दिग्दर्शन करण्यास सज्ज आहेत. टेलीचक्करच्या रिपोर्टनुसार, मेकर्सने सिनेमातील एका महत्वाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरसोबत चर्चा सुरु केली आहे. यामध्ये अॅना डे आर्म्स असण्याची शक्यता आहे. ती 'नो टाइम टू डाय' मध्ये पामोलाच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय ब्रिटिश अभिनेता चिवेटेल एजियोफोरही या सिनेमाचा भाग असणार आहे. येत्या जून महिन्यात सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होण्याच्या शक्यता आहे.

बाँड सीरिज आता नव्या दिग्दर्शनासह क्रिएटिव्ह रिबूट घेत आहे. हा प्रीक्वेल असण्याची शक्यता आहे ज्यामध्ये १९५० ते ६० चं दशक दाखवण्यात येईल. यामध्येच रणबीरही महत्वाचा भाग असू शकतो. अद्याप रणबीरकडून आणि मायकल बे यांच्या टीमकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र रणबीरच्या हॉलिवूड पदार्पणाच्या चर्चांमुळे चाहते खूश झालेत.

रणबीरजवळ सध्या हिंदीतच बरेच प्रोजेक्ट्स आहेत. 'रामायण' मध्ये सध्या तो व्यस्त आहे. यानंतर त्याचा 'लव्ह अँड वॉर' रिलीज होणरा आहे. तसंच 'अॅनिमल पार्क' आणि 'ब्रह्मास्त्र २' ही रांगेत आहेत.

टॅग्स :रणबीर कपूरहॉलिवूडबॉलिवूड