Join us

IPL सामन्यांदरम्यान लॉन्च होणार रणबीर कपूरच्या दत्त बायोपिकचा टीझर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 17:57 IST

संजय दत्त आणि रणबीर कपूरचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता लवकरच या सिनेमाचा टीझर रिलीज केला जाणार आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित सिनेमाची चर्चा सध्या चांगलीत रंगली आहे. संजय दत्त आणि रणबीर कपूरचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता लवकरच या सिनेमाचा टीझर रिलीज केला जाणार आहे.मीडिया रिपोर्टनुसार, आयपीएल सामन्यावेळी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला जाऊ शकतो. असे सांगितले जात आहे की, या सिनेमाचा टीझर आयपीएल सामने दिसणा-या चॅनेलवर लॉन्च केला जाणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, 24 एप्रिलला वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्या दरम्यान या सिनेमाचा टीझर रिलीज करण्याचा प्रयत्न आहे. क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून या सिनेमाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. 

अभिनेता रणबीर कपूर या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. रणबीर कपूरने या सिनेमातील संजय दत्तची भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. संजय दत्त वापरत असलेलं परफ्यूमही रणबीरने वापरलं आहे. या सिनेमात सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दीया मिर्झा यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.

टॅग्स :रणबीर कपूरसंजय दत्त