Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीर कपूरनं सोनाक्षीसोबत काम करण्यास दिला होता नकार, नेमकं काय झालं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 09:45 IST

'दबंग' अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता रणबीर कपूर सध्या चर्चेत आहेत.

 बॉलिवूडचं ग्लॅमर, पैसा हे लोकांना आकर्षित करतं. झगमगत्या विश्वासोबतच बॉलिवूडची दुसरी बाजू देखील कायम चाहत्यांच्या समोर येत असते. मैत्री, भांडणं, अफेअर इत्यादी गोष्टी बॉलिवूडमध्ये सर्सास घडत असतात. शिवाय बॉलिवूडमध्ये असेही काही अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, ज्यांच्या वादाचे अनेक किस्से व्हायरल होत असतात. सध्या असाच एक किस्सा व्हायरल होत आहे. 

बॉलिवूडची 'दबंग' अभिनेत्री म्हणून अभिनेत्री सोनाक्षी (Sonakshi Sinha) सिन्हा प्रसिद्ध आहे. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक सोनाक्षीसोबत एका अभिनेत्यानं काम करण्यास नकार दिला होता. नुकतंच झुमला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनाक्षी याचा खुलासा केला. ती म्हणाली, "मी स्वत: अशा अभिनेत्यांना भेटले आहे जे माझ्याहून वयाने मोठे आहेत. पण मी त्यांच्याहून मोठी दिसते असं सांगत त्यांनी नकार दिला आहे".  सोनाक्षीनं अभिनेत्याचं नाव सांगितलं नाही. पण, रिपोर्टनुसार तो अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा आहे. 

रिपोर्टनुसार, रणबीर कपूरनं एका रोमँटिक कॉमेडी सिनेमामध्ये सोनाक्षी सिन्हासोबत काम करण्यास नकार दिला होता.  रणबीर कपूरने स्क्रिप्टचं कौतुक केलं होतं. पण, त्याने कास्टिंगच्या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली होती. सोनाक्षी सिन्हा त्याच्यापेक्षा वयाने मोठी दिसते, असं त्याला वाटत होत. त्यानं निर्मात्यांना दुसरी अभिनेत्री घेण्यास सुचवलं. पण, निर्मात्यांनी त्याची विनंती मान्य करण्यास तयार नसल्यामुळे रणबीरने या प्रकल्पातून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, वास्तवात रणबीर कपूर सोनापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 

सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती आगामी निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सोनाक्षीसोबत अर्जुन रामपाल, परेश रावल आणि सुहेल नय्यर यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय सोनाक्षी संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्येही दिसणार आहे. तर रणबीर कपूर हा संदीप रेड्डी वंगा यांचा सिक्वेल 'ॲनिमल पार्क' आणि नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटातही दिसणार आहे.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हारणबीर कपूर