Join us

'लव्ह अँड वॉर'साठी रणबीर कपूरचं वर्कआऊट पाहून व्हाल थक्क! ट्रेनरने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 17:45 IST

रणबीर कपूरचा जबरदस्त फिटनेस

संजय लीला भन्साळी आगामी 'लव्ह अँड वॉर' सिनेमाच्या तयारित व्यस्त आहेत. या सिनेमात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), विकी कौशल आणि आलिया भट ही तिकडी दिसणार आहे. रणबीर -विकीने एकत्र काम केलं आहे. तसंच विकी आणि आलियानेही काम केलं आहे. तिघे एकत्र पहिल्यांदाच काम करणार आहेत. स्टारकास्टच इतकी तगडी असल्याने सिनेमा काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. दरम्यान अभिनेता रणबीर कपूर सिनेमासाठी जबरदस्त वर्कआऊट करताना दिसतोय.

रणबीर कपूरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये त्याचा एअरप्लेन मोड पाहायला मिळतोय. वजन उचलून त्याने पोज दिली आहे.  रणबीरचा हा फोटो त्याच्या ट्रेनरने पोस्ट केला आहे. यामध्ये रणबीरच्या फिटनेसची झलक दिसत आहे. तसंच तो सिनेमासाठी त्याच्या शरीरयष्टीवर किती मेहनत घेतोय याचीही कल्पना येत आहे.  

 लव्ह अँड वॉर सिनेमाबाबतीत  आणखी कोणतंही अपडेट आलेलं नाही. सिनेमाची कथा, तिघांच्या भूमिका नेमक्या कशा असतील हेही गुलदस्त्यातच आहे. याशिवाय रणबीरचा  'रामायण' सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे. यासाठीही त्याने शरीरयष्टीवर बरीच मेहनत घेतली आहे. सिनेमात रणबीर  श्रीरामाची भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत आहे. 

टॅग्स :रणबीर कपूरबॉलिवूडव्हायरल फोटोज्फिटनेस टिप्स