Join us

राणादा आणि अंजलीबाईंचा रोमँटिक व्हिडीओ आला समोर, अशी फुलली त्यांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 14:15 IST

Akshaya Deodhar And Hardik Joshi: अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचा एक रोमँटिक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jeev Rangala) मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ उलटला आहे तरीदेखील आजही ही मालिका आणि त्यातील पात्र रसिकांच्या मनात घर करून कायम आहेत. या मालिकेतील कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. या मालिकेतील राणादा आणि अंजली बाईंची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. नुकताच राणादा म्हणजेच हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अंजली बाई म्हणजेच अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांचा साखरपुडा पार पडला आणि फोटो शेअर करून त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान आता त्या दोघांचा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतो आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचा एक रोमँटिक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओत अक्षयाकडे पाहत तिच्या मागे हार्दिक चालताना दिसतो आहे. त्यानंतर हार्दिकने अक्षयाच्या कपाळावर किस करताना दिसतो आहे. या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. 

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली ती 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या सेटवरच. मालिका सुरू झाली तेव्हा दोघांच्या खासगी आयुष्याबद्दलही बऱ्याचदा ऐकायला मिळाले. अक्षयाच्या आयुष्यात तेव्हा हार्दिक नव्हता. त्यावेळी ती सुयश टिळकसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची सोशल मीडियावर चर्चा होती. मात्र काही कारणांमुळे त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अक्षयाच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. मात्र हार्दिक  सिंगल असल्याचे सांगत होता. कालांतराने अक्षया आणि हार्दिक यांच्या रिलेशनशीपच्या चर्चेला जोर धरला होता. पण दोघांनीही कधीही याला दुजोरा दिला नाही. 

अक्षया आणि हार्दिक यांच्यात सोशल मीडियावरील संवाद वाढला होता. एकमेकांच्या फोटोवर कमेंट करणे, दोघांचे एकत्र फोटोशूट देखील वाढले होते. अखेर त्यांनी साखरपुडा केल्यानंतर ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले. 

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीतुझ्यात जीव रंगला