Join us

Goodnews! बाहुबली स्टार राणा दग्गुबाती झाला बाबा? अभिनेत्याने असं केलं रिअ‍ॅक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 12:57 IST

Rana daggubati: मिहिका आणि राणा यांनी २०२० मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचेही अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

'बाहुबली' (Bahubali)  या गाजलेल्या चित्रपटातील भल्लाल देव (Bhallala deva) ही भूमिका गाजवणारा अभिनेता म्हणजे राणा दग्गुबाती (Rana Daggubati). आपल्या उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर राणाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे त्याच्याविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. यामध्येच गेल्या काही दिवसांपासून त्याची पत्नी मिहिका प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. राणा लवकरच बाबा होणार असं म्हटलं जात आहे. मात्र, आता राणाने या वृत्तांवर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता राणा डग्गुबती गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये अशी चर्चा होती की राणाने ही आनंदाची बातमी लपवून ठेवली. त्याची पत्नी मिहिका बजाज प्रेग्नेंट आहे. त्याचवेळी, नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान राणाला याबाबत अखेर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने सत्य सांगितलं आहे.

राणा दुग्गाबतीने नुकतेच इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाला होता. अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. दरम्यान, राणाला विचारण्यात आले की, आता तू फॅमिली मॅन झाला आहेस, या प्रश्नावर राणाने कोणतेही उत्तर दिले नाही मात्र तो हसताना दिसला. ज्यानंतर अभिनेत्याचे चाहते असा अंदाज लावत आहेत की आता राणा बाबा झाला आहे आणि मिहिकासोबत त्याच्या आयुष्यात खूप आनंदी आहे. 

टॅग्स :राणा दग्गुबतीबाहुबली