'रामायण' या महाकाव्याला आपण आजवर हिंदी-मराठी सिनेमा, मालिका, नाटक आणि अन्यही विविध रुपांमध्ये पाहिलंय. आजही 'रामायण' आवडीने पाहिलं जातं. याविषयीची एक बातमी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी 'रामायण- दे लेजेंड ऑफ प्रिन्स राम' ही अॅनिमेटेड फिल्म थिएटरमध्ये पुन्हा रिलीज होतोय. मूळची जपानी असलेली ही आयकॉनिक क्लासिक फिल्म आता मोठ्या पडद्यावर बघण्याची संधी मिळणार आहे.
'रामायण' या तारखेला होणार प्रदर्शित
'रामायण- दे लेजेंड ऑफ प्रिन्स राम' ही अॅनिमेटेड फिल्म प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर २४ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. सिनेमाने याविषयीची ऑफिशिअल घोषणा केलीय. विशेष म्हणजे 4K Ultra Hd साउंडच्या स्पेशल इफेक्ट्स असल्याने 'रामायण- दे लेजेंड ऑफ प्रिन्स राम' ही अॅनिमेटेड फिल्म पाहणं एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. हा सिनेमा इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू भाषेत झळकणार आहे.
या दिग्गज कलाकारांनी दिलेला आवाज
'रामायण- दे लेजेंड ऑफ प्रिन्स राम' या अॅनिमेटेड सिनेमासाठी भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गजांनी आवाज दिला होता. रावणाच्या भूमिकेत अमरिश पूरी, श्रीरामांच्या भूमिकेत अरुण गोविल, नम्रता सहानी सीता, शक्ति सिंग लक्ष्मण, आदर्श गौतम भरत तर सिनेमाचे कथावाचक म्हणून शत्रुघ्न सिन्हांनी भूमिका पार पाडली होती. टेलिव्हिजनवर हा सिनेमा प्रचंड हिट झाला. आता थिएटरमध्ये हा सिनेमा पाहण्याची संधी मिळाल्याने सर्व आनंदी असतील, यात शंका नाही.