Join us
Daily Top 2Weekly Top 5

मी गे नाही पण...! Jr NTR चा शर्टलेस फोटो पाहून रामगोपाल वर्मा यांचा सुटला स्वत:वरचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 16:26 IST

दिग्दर्शक रामगोपाल वर्मा सतत आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. लोक वाट्टेल ती खिल्ली उडवतात. पण रामगोपाल वर्मा कुणालाही जुमानत नाहीत.

ठळक मुद्देलवकरच रामगोपाल वर्मा अ‍ॅडल्ट स्टार मिया मल्कोवासोबत ‘क्लायमॅक्स’ नावाचा एक चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.

दिग्दर्शक रामगोपाल वर्मा सतत आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. अनेकदा या ट्विटमुळे राम गोपाल वर्मा ट्रोल होतात. लोक वाट्टेल ती खिल्ली उडवतात. पण रामगोपाल वर्मा कुणालाही जुमानत नाहीत. सध्या ते अशाच एका ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. होय, आज साऊथ इंडियन सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त राम गोपाल वर्मा यांनी ज्युनिअर एनटीआरला शुभेच्छा दिल्यात. सोबत ज्युनिअर एनटीआरचा एक शर्टलेस फोटोही शेअर केला. इथपर्यंत सगळे ठीक होते. पण या फोटोसोबत रामगोपाल वर्मा यांनी लिहिलेले कॅप्शन पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये त्यांनी अ‍ॅडल्ट स्टार मिया मल्कोवा हिलाही टॅग केले.

ट्विटमध्ये रामगोपाल यांनी लिहिले, ‘मी गे नाही, हे तुला चांगल्याप्रकारे माहित आहे. पण तुझा हा फोटो पाहिल्यानंतर मी गे बनू इच्छितो...’त्यांच्या या ट्विटनंतर नेहमीप्रमाणे अनेक नेटक-यांनी त्यांची मजा घेतली नसेल तर नवल. अद्याप ज्युनिअर एनटीआरने मात्र या ट्विटवर काहीही उत्तर दिलेले नाही.

लवकरच रामगोपाल वर्मा अ‍ॅडल्ट स्टार मिया मल्कोवासोबत ‘क्लायमॅक्स’ नावाचा एक चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. रामगोपाल दिग्दर्शित या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये बोल्डनेसचा भडीमार पाहायला मिळाला होता. या ट्रेलरमुळे रामगोपाल वर्मा चर्चेत आहेत.त्याआधी दारूच्या दुकानाबाहेर महिलांची रांग असल्याचा फोटो शेअर करून त्यांनी असेच एक ट्विट केले होते.  दारूच्या दुकानापुढे महिलांची रांग पाहून त्यांनी एक ट्विट केले होते आणि त्यांच्या या ट्विटने गायिका सोना मोहपात्रा जाम खवळली होती. ‘ दारूच्या दुकानांबाहेरच्या रांगेत कोण उभे आहे, पाहाच... याच नंतर स्वत:च्या काळजीपोटी दारू पिणा-या पुरूषांबद्दल गळे काढतात...,’ असे खोचक ट्विट रामगोपाल वर्मा यांनी केले होते.

टॅग्स :राम गोपाल वर्मा