Join us  

राम गोपाल वर्मांवर चढलंय Animal चं भूत, रणबीर कपूरचा लूक करत म्हणाले,...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 12:24 PM

राम गोपाल वर्मा यांनी रणबीर कपूरचा Animal मधला लूक करत फोटो ट्वीट केला आहे.

रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor)  नुकत्याच रिलीज झालेल्या Animal सिनेमावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी सिनेमाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तरी बॉक्सऑफिसवरचे आकडे मात्र वेगळंच सांगत आहेत. सिनेमाने वर्ल्डलाईड 700 कोटींचा बिझनेस केलाय. Animal सिनेमामुळे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा अधिकच प्रभावित झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी सुरुवातीपासूनच सिनेमाची भरभरुन स्तुती केली आहे. आता तर त्यांच्या एका ट्वीटमुळे त्यांच्यावर Ainmal चं भूत चढल्याचं पाहायला मिळतंय.

राम गोपाल वर्मा यांनी रणबीर कपूरचा Animal मधला लूक करत फोटो ट्वीट केला आहे. हा मॉर्फ्ड फोटो आहे. यामध्ये ते रणबीर कपूरच्या Animal मधील डेडली लूकमध्ये दिसत आहेत. त्यांनी हा फोटो शेअर करत लिहिले,'जर कोणी माझ्यातल्या प्राण्याशी टक्कर घेण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला खाऊन टाकेन.'

राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर Animal साठी आधीही एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी लिहिले,'आता जेव्हा अॅनिमल बॉक्सऑफिसवर प्रेक्षकांचे पैसे खात आहे, तर मी विचार करतोय की लोक संस्कारांच्या संरक्षाणासाठी काय करणार?'

1 डिसेंबरला रिलीज झालेल्या Animal ने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलाय. भारतात सिनेमाने 400 कोटींचा गल्ला जमवला आहे तर वर्ल्डवाईड 700 कोटी कमावले आहेत. 

टॅग्स :राम गोपाल वर्मारणबीर कपूरसिनेमा