Join us

राम चरणच्या पत्नीची कोणत्याही क्षणी होऊ शकते डिलिव्हरी, उपासनाने फ्लॉन्ट केला तिचा बेबी बम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 19:18 IST

साऊथचे सुपरस्टार राम चरण आणि उपासना कामिनेनी त्यांच्या पहिल्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेग्नेंन्सीचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय.

साऊथचे सुपरस्टार राम चरण आणि उपासना कामिनेनी(Upasana Kamineni)  त्यांच्या पहिल्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत. लग्नाच्या १० वर्षानंतर राम चरण आणि उपासना आई-बाबा होणार आहेत. याकाही दिवसांपूर्वी दुबईत उपासनाचे बेबी शॉवर झालं होतं, यादरम्यानचे फोटो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होते. 

मदर्स डेच्या निमित्ताने, उपासनाने ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये बंम्प फ्लॉन्ट करतानाचा  एक फोटो शेअर केला आहे. मदर्स डेच्या निमित्ताने उपासनाने हा फोटो शेअर केला होता. पहिला मदर्स डे साजरा करताना तिला खूप अभिमान वाटतो असे तिने सांगितले होते.

उपासना कामिनेनी ८ महिन्यांची प्रेग्नेंट आहे. फोटोमध्ये ती तिच्या बेबी बम्पसोबत स्मितहास्य करताना दिसत आहे. तिने पोस्टला कॅप्शन देखील दिले आहे, ज्यात लिहिले आहे, 'सर्व योग्य कारणांसाठी मातृत्व स्वीकारल्याचा मला अभिमान आहे.' 

 १४ जुन २०१२ साली रामचरण आणि उपासना लग्नबंधनात अडकले. हैदराबाद येथे त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. अनेक राजकीय आणि साऊथ, बॉलिवुड कलाकारांनी लग्नात हजेरी लावली. लग्नाच्या १० वर्षांनंतर दोघांच्या आयुष्यात ही आनंदाची बातमी आली आहे. त्यामुळे हे वर्ष नक्कीच रामचरणसाठी खास असणार आहे.  

टॅग्स :राम चरण तेजाप्रेग्नंसी