Join us

'तारक मेहता'च्या दया बेन भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्रीची वर्णी लागण्याची शक्यता, जाणून घ्या कोण आहे 'ती'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 17:54 IST

अखेर या मालिकेला अलविदा म्हटले आहे. आता दीशा मालिकेत झळकणार नाही हे स्पष्ट होते. तुर्तास दया बेन भूमिकेसाठी नवीन नाव समोर येत आहे.

'तारक मेहता' मालिकेत दया बेन भूमिकेतून दीशा वाकानी प्रचंड लोकप्रिय झाली. सप्टेंबर 2017 मध्ये दीशा मॅटर्निटी लिव्हवर गेली त्यानंतर ती मालिकेत परतलीच नाही. मुलगी लहान असल्यामुळे तिला मालिकेत काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे तिने ब्रेक घेतल्याचे समोर आले होते. तेव्हापासून आजपर्यंत चाहतेही दया बेनच्या येण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. 

 दीशा मालिकेत कमबॅक करणार असे वृत्त काही दिवसांपुर्वी आले होते. मात्र मालिकेचे निर्माते असीत मोदीने दिलेल्या माहितीनुसार नवीन दयाबेनचा शोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे दीशा वाकानीने अखेर या मालिकेला अलविदा म्हटले आहे. आता दीशा मालिकेत झळकणार नाही हे स्पष्ट होते. तुर्तास दया बेन भूमिकेसाठी नवीन नाव समोर येत आहे. 

राखी विजान मालिकेत दया बेनच्या भूमिकेत झळकू शकते. राखी विजानने दिलेल्या मुलाखतीत तिला दया बेन ही भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अधिकृत घोषणे आधी राखीने चाहत्यांना दिलेले संकेत तर नाही ना असेच सा-यांना वाटत आहे. राखी विजानने दया बेन साकारण्याची इच्छा व्यक्त केलेली असली तरी मालिकेच्या निर्मांत्याकडून अजुनतरी कोणत्याही प्रकारेच स्पष्टीकरण आलेले नाही.

टाइम्स ऑफ इंडिलायाला दिलेल्या मुलाखतीत राखीने सांगितले की, कोणतीही अभिनेत्री दया बेन साकारु शकत नाही. कारण दया बेन हे एक आयकॉनिक कॅरेक्टर आहे. मला जर संधी मिळाली तर नक्कीच मी हे पात्र चांगल्या प्रकारे साकारण्याचा प्रयत्न करेन. चाहत्यांना मी हसवण्याचा प्रयत्न करेन.

 

दया बेन भूमिकेसाठी माझ्या नावाच विचार करायला काहीच हरकत नसल्याचे तिने म्हटले आहे. त्यामुळे आता मेकर्स राखी विजानचा दया बेनच्या भूमिकेसाठी विचार करतात का हे का हे पाहणे रंजक ठरणार आहे.  

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी