Join us
Daily Top 2Weekly Top 5

राखी सावंतचा नवीन कारनामा, घरात आला राखीचा मुलगा, म्हणाली राहुल वैद्यचा आहे त्याचा बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 11:22 IST

बिग बॉस १४मध्ये राखी सावंत चांगलीच धुमाकुळ घातलाना दिसत आहे. तिच्या लोकप्रियतेचा शोलाही चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळे राखी जे काही करत त्यावर जास्त विचार न करता फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने पाहिले जाते.

कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन, आयटम गर्ल, एक अशी व्यक्ती जिच्यासाठी चर्चेत राहणं काहीच अवघड नाही, ती म्हणजे अभिनेत्री राखी सावंत. ती कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखीच्या खासगी आयुष्याबद्दलही कायम चर्चा असते. विविध कारनामे करत ती लाइमलाइटमध्ये राहण्याचा प्रयत्न करेत. सध्या बिग बॉस १४मध्ये राखी सावंत चांगलीच धुमाकुळ घातलाना दिसत आहे.

 

तिच्या लोकप्रियतेचा शोलाही चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळे राखी जे काही करत त्यावर जास्त विचार न करता फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने पाहिले जाते. त्यामुळे आयटम गर्ल राखी सावंत आता बेस्ट एंटरटेनरही बनली आहे. घराबाहेर असतानाही राखीने तिच्या लग्नाचा घाट घातला मात्र पतीचा चेहराच नाही दाखवला.

 

बिग बॉसच्या घरात लग्नाच्या विषयाला घेवून राखी प्रचंड धुमाकुळ घालताना दिसत आहे. पती रितेशला लग्नानंतर एकदाही भेटली नसल्याचा दावा करणारी राखीचा 'बिग बॉस १४' एक नवी प्रोमो समोर आला आहे. प्रोमोत दिसत असल्याप्रमाणे राखीनेटॉवेलमध्ये एक जॅकेट दुमडून ठेवलं आहे आणि त्याला ती बाळ खेळताना दिसत आहे. तसेच या बाळाचा बाबा राहुल वैद्य असल्याचेही सांगताना दिसत आहे. राहुल वैद्यही राखीची मजा घेताना दिसत आहे. 

 राहूल वैद्यने घातली राखी सावंतला आंघोळ, Video Viral

चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत तो लक्ष वेधून घेत आहे. म्हणूनच की काय, राखी सावंतलाही आंघोळ घालण्याचे काम राहुल वैद्यनेच पार पाडले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांना हा व्हिडीओ पाहून थोडे आश्चर्य वाटत असून पब्लिसिटी स्पर्धक काहीही करायला तयार आहेत हेच यावरुन स्पष्ट होत असल्याचे चर्चा आहेत. काहींना त्याचा हा अंदाज आवडत आहे तर काहींना फारसा रुचला नाहीय. शोमध्ये स्पर्धकही अनेकवेळा राहुल वैद्यला टार्गेट करताना दिसतात. शोची स्पर्धक निक्की तांबोळीनेदेखील राहुल वैद्यविषयी काही गोष्टी सांगितल्या होत्या. राहुल महिलांचा सन्मान करत नाही त्याला महिलांसोबत कसे बोलायचे ते कळत नाही असे ती म्हणाली होती.

टॅग्स :राखी सावंतराहुल वैद्य