Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मुकेश-नीता अंबानी मला कर्ज देणार आहेत", राखीचं अजब वक्तव्य, म्हणाली, "मला ते फोन करून पार्टीसाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 10:54 IST

राखीने प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याबाबत एक अजब वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.राखीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा राखी तिच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. राखीने प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याबाबत एक अजब वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

राखीचा एक व्हिडिओ विरल भय्यानी या पापाराझी पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत राखी अंबानी कुटुंबाबद्दल बोलत आहे. राखी म्हणते, "मुकेश अंबानी आणि नीता अंबानी मला फोन करतात. पार्टीला येण्यासाठी नीता अंबानी मला आग्रह करतात. ईशा अंबानीही मला कॉल करते. आमच्या फंक्शनमध्ये ब्रँडेड साडी आणि छोटी पर्स घेऊन ये, असं ते मला म्हणतात. माझ्याकडे तर सगळ्या ब्रँडेड वस्तू आहेत. पण, मी त्यांना नाही म्हणते. माझ्याकडे वेळ नाही असं मी त्यांना सांगते." 

राखीने अंबानी कुटुंबीयांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. अंबानी कर्ज देणार असल्याचंही राखीने सांगितलं. "ती खूप चांगली माणसं आहेत. आता मुकेश आणि नीता अंबानी मला खूप मोठं कर्ज देणार आहेत," असंही राखी म्हणाली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

राखी एक उत्तम डान्सर आहे. तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांत आयटम साँग केले आहेत. त्याबरोबरच राखी छोट्या भूमिकाही साकारताना दिसली. हिंदीबरोबरच तिने कन्नड, तेलुगु, तमिळ चित्रपटांतही काम केलं आहे. मराठी आणि हिंदी बिग बॉसमध्येही ती सहभागी झाली होती. 

टॅग्स :राखी सावंतमुकेश अंबानीनीता अंबानी