Join us

'सेक्रेड गेम्स'मध्ये इंटिमेट सीन दिल्यामुळे मराठी अभिनेत्रीवर बसला अडल्ट फिल्मस्टारचा ठपका; म्हणाली..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 15:22 IST

Rajshri deshpande: या सीरिजमध्ये अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

नवाजुद्दीन सिद्धिकी याची 'सेक्रेड गेम्स' ही वेब सीरिज ओटीटीवर विशेष गाजली. या सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडे हिने नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या सीरिजमध्ये तिचे आणि नवाजचे काही इंटिमेट सीन होते. विशेष म्हणजे या सीरिजनंतर तिच्यावर अडल्ट फिल्मस्टार असा ठपका बसला. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने याविषयी भाष्य केलं. 

सेक्रेड गेम्समधील राजश्री आणि नवाज यांचे काही इंटिमेट सीन सोशल मीडियावर व्हायरल झाले. इतकंच नाही तर काहींनी ते मॉर्फ करुन त्याचा गैरवापरही केला. त्यामुळे तिला अडल्ट फिल्मस्टार असा टॅग बसला, असंही तिने या मुलाखतीत सांगितलं.

"सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सिझननंतर माझा सीन व्हायरल झाला. नंतर तो मॉर्फ केला गेला आणि सगळीकडे व्हायरल केला गेला. माझ्याविषयी सोशल मीडियावर अनेक पोस्ट लिहिल्या गेल्या. त्या सीरिजमध्ये माझ्यासोबत नवाजनेही काम केलं होतं. पण,त्याला कोणी प्रश्न विचारले नाहीत. दिग्दर्शक अनुराग कश्यपला सुद्धा त्या सीनविषयी प्रश्न विचारला नाही.  पण, तू हा सीन का केलास? असा प्रश्न मला विचारण्यात आला. इतकंच नाही तर माझा उल्लेख पॉर्न अभिनेत्री म्हणून केला जाऊ लागला, '' असं राजश्री म्हणाली.

पुढे ती म्हणते, ''माझी सगळी ओळख सेक्रेड गेम्स अभिनेत्रा एवढ्या पूरतीच मर्यादित राहिली. ट्रायल बाय फायर ही माझी सीरिज उत्तम असूनही तिला सेक्रेड गेम्स एवढी लोकप्रियता मिळाली नाही''. दरम्यान, राजश्रीने अनेक गाजलेल्या वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. यात फेम गेम, ट्रायल बाय फायर या नेटफ्लिक्स शोजचा समावेश आहे. सेक्रेड गेम्सनंतर तिला फक्त इंटिमेट सीनसच्याच भूमिका ऑफर झाल्या. 

टॅग्स :वेबसीरिजसॅक्रेड गेम्सनवाझुद्दीन सिद्दीकी