बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव ९ कोटी चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगात होता. अखेर कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली आहे. आज राजपालची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर येताच राजपालने मीडियाशी संवाद साधत या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल यादव म्हणाला, "मला इंडस्ट्रीमध्ये ३० वर्ष झाली आहेत. लहाणांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी पाठिंबा दिला म्हणून मी २५० सिनेमे करू शकलो. २०१२-१३ पासून हे सुरू आहे. भारतीय सिनेमातील छोटे, मोठे सगळेच माझ्यासोबत आहेत. हा संपूर्ण देश माझ्याबरोबर आहे. माझा उद्देश काय होता हे सगळ्यांनाच माहीत आहे. कोर्टाच्या आदेशांचं मी पालन केलं आहे. त्यांनी जिथे सांगितलं तिथे मी उपस्थित राहिलो. आणि यापुढेही मी कोर्टाच्या आदेशाचं पालन करेन. मला सगळ्यांनी समर्थन दिलं. सोशल मीडियावरही लोकांनी मला प्रेम दिलं. दीड कोटी लोक मला प्रेम करतात. त्या सगळ्यांसोबत माझं फक्त एंटरटेनमेंटचं नातं आहे. बॉलिवूडने जे प्रेम मला दिलं. त्यासाठी मी आभारी आहे".
नेमकं प्रकरण काय?
राजपाल यादवने काही वर्षांपूर्वी एका सिनेमासाठी व्यावसायिक माधव अग्रवाल यांच्याकडून ५ कोटी घेतले होते. मात्र सिनेमा फ्लॉप झाल्याने त्याला नुकसान झालं. व्याजासहित ही रक्कम आता ९ कोटींपर्यंत पोहोचली आहे. पैसे परत करू न शकल्याने राजपालला तिहार तुरुंगात जावं लागलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्याने सरेंडरही केलं होतं. त्यानंतर जामिनासाठी त्याने अर्ज केला होता. कोर्टाने त्याला दीड तासांत दोन कोटी रक्कम भरण्याचे आदेश देत त्याला जामीन मंजूर केला होता. अखेर आज त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली.
Web Summary : Actor Rajpal Yadav was released from Tihar Jail after bail in a cheque bounce case. He thanked his supporters, Bollywood, and the public. Yadav mentioned his 30 years in the film industry and commitment to court orders. The case involved a 9 crore debt from a failed film.
Web Summary : चेक बाउंस मामले में जमानत मिलने के बाद अभिनेता राजपाल यादव तिहाड़ जेल से रिहा हुए। उन्होंने अपने समर्थकों, बॉलीवुड और जनता को धन्यवाद दिया। यादव ने फिल्म उद्योग में अपने 30 वर्षों और अदालत के आदेशों के प्रति अपनी प्रतिबद्धता का उल्लेख किया। मामला एक असफल फिल्म से जुड़े 9 करोड़ के कर्ज का था।