लग्न, रिसेप्शन निपटल्यानंतर दीपिका पादुकोण आपल्या नव्या चित्रपटाच्या तयारीला लागलीय. होय,दीपिका पुन्हा आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये परतण्यास तयार आहे. लग्नानंतरचा दीपिकाचा पहिला चित्रपट अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी हिच्या आयुष्यावर बेतलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटासाठी हिरोचा शोध सुरू होता आणि या भूमिकेसाठी राजकुमार राव व आयुष्यमान खुराणा यांच्यात रस्सीखेच सुरु होती. या चित्रपटात मेकर्सला दीपिकाच्या तोडीचा दमदार अॅॅक्टर हवा होता. मेर्कर्सच्या डोक्यात या भूमिकेसाठी राजकुमार राव आणि आयुष्यमान खुराणा या दोघांची नावे होती. पण दोघेही एकमेकांपेक्षा तसूभरही कमी नाहीत म्हटल्यावर या दोघांपैकी कुणाला साईन करावे, असा प्रश्न मेकर्सला पडला होता. पण आता मेकर्सनी दोघांपैकी एक नाव फायनल केलेय. हे नाव आहे, राजकुमार राव याचे.
आयुष्यमानचा ‘पत्ता कट’! राजकुमार राव बनणार दीपिका पादुकोणचा हिरो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 16:04 IST
गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटासाठी हिरोचा शोध सुरू होता आणि या भूमिकेसाठी राजकुमार राव व आयुष्यमान खुराणा यांच्यात रस्सीखेच सुरु होती.
आयुष्यमानचा ‘पत्ता कट’! राजकुमार राव बनणार दीपिका पादुकोणचा हिरो!!
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}