Join us
Daily Top 2Weekly Top 5

हा अभिनेता लॉकडाऊनमध्ये चक्क कापतोय प्रेयसीचे केस, पाहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 19:43 IST

प्रेक्षकांचा लाडका अभिनेता आता अभिनय सोडून केस कापण्याचे काम करू लागला आहे असेच हा व्हिडिओ पाहून म्हणावे लागेल.

ठळक मुद्देप्रेक्षकांचा लाडका अभिनेता राजकुमार राव अभिनय सोडून केस कापण्याचे काम करू लागला आहे, त्याने त्याची प्रेयसी पत्रलेखाचे केस कापतानाचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. या दरम्यान सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. सध्या सेलिब्रेटी आपापल्या घरात असून सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत आहेत. एका अभिनेत्याने तर आपल्या प्रेयसीचे केस कापतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

प्रेक्षकांचा लाडका अभिनेता राजकुमार राव अभिनय सोडून केस कापण्याचे काम करू लागला आहे. त्याने त्याची प्रेयसी पत्रलेखाचे केस कापतानाचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.हा व्हिडिओ केवळ काही तासांमध्ये एक लाख १६ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. राजकुमार एक खूप चांगला बॉयफ्रेंड असल्याचे त्याचे चाहते सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.

राजकुमार आणि पत्रलेखाचे कपल बॉलिवूडमध्ये आदर्श कपल म्हणून ओळखले जाते. या कपलने आपले नाते कधीच कुणापासून लपवले नाही. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सर्रास शेअर करतात. ते दोघे अनेक वर्षांपासून नात्यात आहेत. पत्रलेखाने हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाईट्स’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. राजकुमार राव आणि पत्रलेखाची पहिली भेट एफटीआयआयमध्ये झाली होती. एका शॉर्टफिल्म्सच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले असे म्हटले जाते. 

टॅग्स :राजकुमार रावपत्रलेखा