बॉलिवूड सिनेमाच्या नव्या पिढीतील सर्वाधिक यशस्वी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी आपल्या ‘मुन्नाभाई 3’ या आगामी चित्रपटासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. राजकुमार हिरानी यांनी आत्तापर्यंत जे काही चित्रपट बनवलेत, ते सगळे विधु विनोद चोप्रांच्या बॅनरखाली बनवलेत. बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाल्यानंतर राजकुमार यांनी आपले स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस बनवले. पण तरीही विधु विनोद चोप्रांच्या बॅनरची साथ सोडली नाही.
अलीकडे रिलीज झालेला त्यांचा ‘संजू’ हा सिनेमाही राजकुमार हिरानी फिल्म व विधु विनोद चोप्रांच्या बॅनरने प्रोड्यूस केला होता. पण आता राजकुमार हिरानी आपल्या करिअरमधील पहिला असा स्वनिर्मित चित्रपट बनवणार आहेत. डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, ‘मुन्नाभाई 3’ हा चित्रपट राजकुमार हिरानी बॅनरचा पहिला चित्रपट असेल. याचे विधु विनोद चोप्रांच्या बॅनरशी काहीही देणेघेणे नसेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरानींनी ‘मुन्नाभाई 3’ची स्क्रिप्ट पूर्ण केली आहे आणि हा चित्रपट ते स्वत: प्रोड्यूस करतील. या चित्रपटाचीस्टारकास्ट फायनल करण्याचे काम सुरू आहे.